७५ वर्षीय वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याची आयुष्यभराची कमाई घेऊन पसार झाली ‘सुंदरी’
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ७५ वर्षीय वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याची आयुष्यभराची कमाई घेऊन पसार झाली ‘सुंदरी’

७५ वर्षीय वृद्धाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याची आयुष्यभराची कमाई घेऊन पसार झाली ‘सुंदरी’

Jun 06, 2024 04:38 PM IST

cyber fraud : एका ७५ वर्षीय व्यावसायिकाचे लिंक्डइनवर भेटलेल्या एका महिलेशी सूत जुळले. त्यानंतर ही महिला त्याची आयुष्यभराची कमाई असलेले ६ कोटी रुपये घेऊन पसार झाली.

तरुणी बनून आरोपीने वृद्धाला कोट्यवधीला लुबाडले.
तरुणी बनून आरोपीने वृद्धाला कोट्यवधीला लुबाडले.

जगभरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढताना दिसत आहेत. केवळ भारतात नव्हे तर जगभरातील देश सायबर गुन्ह्यांमुळे त्रस्त झाले आहेत. आरोपी इंटरनेट यूजर्संची फसवणूक करण्यासाठी नवनवीन फंडे आजमावत असतात. ऑनलाइन फ्रॉड लोकांना भावनेशी खेळ आहे. अशाच प्रकारचा ऑनलाइन फ्रॉडचा प्रकार समोर आला आहे. येथे एका ७५ वर्षीय व्यावसायिकाचे लिंक्डइनवर भेटलेल्या एका महिलेशी सूत जुळले. त्यानंतर ही महिला त्याची आयुष्यभराची कमाई असलेले ६ कोटी रुपये घेऊन पसार झाली.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार हे प्रकरण अमेरिकी मिडवेस्टमधील एका व्यक्तीशी संबंझित आहे. हा व्यक्ती "पिग बुचरिंग" नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका ऑनलाइन स्कॅमचा शिकार झाला आहे. हा घोटाला लिंक्डइनवर एका धोकेबाज व्यक्तीच्या संदेशाने सुरू झाला. एक व्यक्ती चीनमधील श्रीमंत महिला असल्याचे भासवून व्यक्तीला मेसेज करत होते. आरोपीने सॅनफ्रान्सिको येथे रहात असून सोन्याची व्यापारी असल्याचे म्हटले. त्याने आपल्या अलिशान जीवन शैलीचे काही फोटोही शेअर केले होते. त्याने त्या वृद्ध व्यावसायिकाच्या यशाचे कौतुक केले होते. दोघांमध्ये व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू झाले. 

आरोपी वृद्दासोबत एका मुलीप्रमाणे संवाद साधू लागला. वृद्ध आरोपीच्या जाळ्यात फसत गेले व आपल्या जेवण्या खाण्यासह अन्य व्यक्तिगत माहिती शेअर करू लागला. आरोपीवर विश्वास ठेऊन पीडित त्याच्यावर विश्वास ठेऊ लागला. 

दोघांमध्ये विश्वासाचे संबंध निर्माण झाल्यानंतर वायोलेन याने प्रस्ताव दिला की, ते एकाच ट्रेडिंग प्लेटफॉर्मवर गुंतवणूक करतील. त्याबाबत त्याने सांगितले की, त्याची मालकी त्याच्या काकाकडे आहे. त्या व्यक्तीने ट्रेडिंग संबंधित app वर अकाउंट बनवण्यात मदत केली तसेच सुरुवातीला १,५०० डॉलर जमा करण्यासाठी तयार केले. 

वृद्धाने मुलगी बनून बोलत असलेल्या आरोपीच्या जाळ्यात अडकून आपले स्टॉक आणि म्यूचुअल फंड विकले. त्यानंतर त्यांनी ट्रेडिंग अकाउंटमध्ये ३,००,००० हून अधिक डॉलर जमा केले.  App  ने त्यांनी गुंतवणूक जवळपास १.५ मिलियन डॉलर पर्यंत वाढताना दाखवले. 

दरम्यान, जेव्हा पीडित व्यक्तीने आपला पैसा काढण्याचा प्रयत्न केले तर त्याची रिक्वेसट ब्लॉक केली तसेत पैसे देण्यासाठी त्याच्याकडे अतिरिक्त शुल्क भरण्याची मागणी केली गेली. त्यानंतर हताश झालेल्या वृद्धाने बँक कर्ज व होम-इक्विटी कर्जाचा वापर करून हे शिल्क भरले. यामध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले. आरोपीने यासाठी पीडिताला दोषी ठरवले व त्याच्याशी संवाद साधणे बंद केले.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर