मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  काय सांगता.. ७० वर्षीय वृद्ध सासऱ्याचा २८ वर्षाच्या सुनेवर जडला जीव, मंदिर जाऊन केले लग्न

काय सांगता.. ७० वर्षीय वृद्ध सासऱ्याचा २८ वर्षाच्या सुनेवर जडला जीव, मंदिर जाऊन केले लग्न

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 27, 2023 03:56 PM IST

वृद्ध सासऱ्याने आपल्याहून ४२ वर्षांनी लहान सुनेशी मंदिरात जाऊन लग्न केल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. मुलाच्या अकाली निधनाने विधवा झालेल्या सुनेशी सासऱ्याने लग्न केले.

सासऱ्याचे सुनेबरोबर लग्न
सासऱ्याचे सुनेबरोबर लग्न

उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्ह्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका गावातील ७० वर्षाच्या सासऱ्याचा आपल्याच २८ वर्षीय सुनेवर जीव जडला. दोघांनी समाज व नातेवाईकाचा विचार न करता मंदिरात जाऊन एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून विवाग केला. ४२ वर्षांनी लहान सुनेशी सासऱ्याने केलेल्या या लग्नाने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. या  नव विवाहित जोडप्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. 

विवाह करणारा ७० वर्षाचा वृद्ध कैलाश यादव बडहलगंज पोलीस ठाण्यात चौकीदार आहे. १२ वर्षापूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. छपिया उमराव गावात राहणाऱ्या कैलाश यादव यांनी मंदिरात जाऊन आपल्या मुलाच्या पत्नीशी विधीवत विवाह केला. दोघांच्या या निर्णयाने सर्वजण अचंभित आहेत. दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रत्येकजण या विवाहाची चर्चा करत आहेत. 

Pariksha Pe Charcha : विद्यार्थ्यांच्या 'त्या' प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी घेतली विरोधकांची 'शाळा
कैलाश यादव यांच्या चार मुलांपैकी तिसऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याने सून विधवा झाला होती. सांगितले जात आहे की, गेल्या काही दिवसांपासून सूनेचे दुसरीकडे लग्न लावून देण्याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान सासऱ्यला सुनेबद्दल प्रेम उफाळून आले. त्यानंतर त्यांनी समाज व कुटूंबाची चिंता न करता सूनेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सुनेनेही लग्नाला होकार दिल्यानंतर दोघांनी मंदिरात जाऊन विवाह केला. दोघांनी परस्पर संमतीने लग्न केल्याने कुणीही याबाबत तक्रार दाखल केली नाही.

WhatsApp channel

विभाग