मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Earthquake: फिलीपिन्समध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, सुनामीचा इशारा

Earthquake: फिलीपिन्समध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, सुनामीचा इशारा

Dec 02, 2023 09:35 PM IST

Earthquake In Phillippines : फिलिपाइन्समधील मिडानाओ बेट शनिवारी सायंकाळच्या सुमारास ७.४ तीव्रतेच्या भूकंपाने हादरले, येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

Earthquake In Phillippines
Earthquake In Phillippines

Philippines Mindanao Earthquake : फिलीपिन्सच्या मिडानाओ येथे आज (शनिवार) ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार हा भूकंप रात्री ८ वाजून ७ मिनिटांनी झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ५० किलोमीटर खोल होता.

वृत्तानुसार, युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटर (EMSC) ने या भूकंपाची तीव्रता ७.४ आणि त्याचा केंद्रबिंदू ६३ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगितले. भूकंपानंतर अमेरिकन त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने सुनामीचा इशारा दिला होता.

 

ट्रेंडिंग न्यूज

सामान्यपणे रिश्टर स्केलवर ७ किंवा त्याहून अधिकतीव्रतेचा भूकंप भीषण व हानीकारक मानला जातो. फिलीपींसमध्ये आलेल्या या भूकंपाने कितीचे नुकसान झाले याचा आकडा समोर आलेला नाही.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर