मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नियंत्रण सुटल्यानं कार दरीत कोसळली, पाच वर्षाच्या मुलासह ६ जण जागीच ठार

नियंत्रण सुटल्यानं कार दरीत कोसळली, पाच वर्षाच्या मुलासह ६ जण जागीच ठार

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 28, 2024 10:34 PM IST

Uttarakhand dehradun Car Accident News: उत्तराखंडमधील डेहरादूर जिल्ह्यात कार दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली.

Uttarakhand Accident
Uttarakhand Accident

Uttarakhand dehradun Accident News Today: उत्तराखंडमधील डेहरादून परिसरात कार दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात पाच वर्षाच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. डेहरादून जिल्ह्यातील त्यूणीजवळ कार दरीत कोसळली. या अपघातात हिमाचल प्रदेशातील दाम्पत्य आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाला आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

स्थानिक पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कार हिमाचल प्रदेशातील पांद्रणू येथून उत्तराखंडमधील दसौं गावाकडे जात होती. कारमधील एक जण वगळता सर्व सहा जण हिमाचल प्रदेशातील एकाच गावचे रहिवासी होते. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने खोल दरीतून मृतदेह बाहेर काढले. हनासू गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजू (वय, ३५), सूरज (वय, ३५), त्याची पत्नी शीतल (वय, २५), मुलगा यश (वय, ५), संजना (वय,२१) आणि दिव्यांश (वय,१०) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात जखमी झालेल्या जीत बहादूर (वय, ३६) याला प्राथमिक आरोग्य केंद्र त्युणी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

 

IPL_Entry_Point

विभाग