मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Afghanistan Sikh : तालिबान्यांनी आमचे हाल केले; तुरुंगात डांबून आमचे केस कापले; ५५ शिख अफगाणिस्तानातून भारतात परतले

Afghanistan Sikh : तालिबान्यांनी आमचे हाल केले; तुरुंगात डांबून आमचे केस कापले; ५५ शिख अफगाणिस्तानातून भारतात परतले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 26, 2022 02:34 PM IST

Afghanistan Sikh came in India : अफगाणिस्तानात अडकलेले ५५ शिख अखेर भारतात परतले. त्यांनी त्यांच्यावर झालेले अत्याचार मध्यमांसमोर मांडले.

५५ शिख अफगाणिस्तानातून भारतात परतले
५५ शिख अफगाणिस्तानातून भारतात परतले

दिल्ली : अफगाणिस्तानात सत्तांतर झाल्यापासून तेथील अल्पसंख्याकावर मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहेत. त्यात भारतीय शिख देखील भरडले गेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तान शिख हे भारतात परतले आहेत. सोमवारी देखील तब्बल ५५ शिख हे भारतात परतले असून त्यांच्यावर तालिबान्यांनी केलेल्या अत्याचाराचे कथन त्यांनी माध्यमांपुढे केले.

काही दिवसांपूर्वी भारतात परत येण्याच्या तयारीत असलेले ५५ शिख नागरिकांना गुरुग्रंथ साहिब अफगाणिस्तानातून भारतात आणण्यास तालिबान्यांनी रोखले होते. तालिबान्यांनी हा ग्रंथ त्यांचा सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगितले होते. अखेर हे ५५ शिख नागरिक एका विशेष विमानाने भारतात परतले. त्यांना अफगाणिस्तानातून दिल्ली विमानतळावर आणण्यात आले. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानात तालिबान कशा पद्धतीने अल्पसंख्यांकांवर अत्याचार करत आहे हे सांगितले. या अफगाण शीख नागरिकांनी भारतात पोहोचल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला असून यावेळी त्यांनी तालिबानी कसे अत्याचार करत होते याची आपबीती देखील कथन केली.

भारतात अफगाणिस्तानातून परतलेले बलजीत सिंग म्हणाले, अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तालिबान्यांनी मला तब्बल चार महिने तुरुंगात ठेवले होते. याठिकाणी माझ्यावर खूप अत्याचार करण्यात आले. तालिबान्यांनी तुरुंगात असतांना आमचे केस कापले. तसेच आमच्या धर्माची विटंबना केली. आता मी भारतात परतला असून स्वत:ला सुरक्षित समजत आहे. आमच्यापैकी अनेकांची कुटुंबे अजूनही अफगाणिस्तानात अडकून आहेत. त्यांना देखील भारत सरकारने भारतात आणावे अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग