Man Masturbates On Girl Face: धावत्या ट्रेनमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशाच्या चेहऱ्यासमोर हस्तमैथुन केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक करण्यात आली. ही घटना मंगळवारी (२ जानेवारी २०२३) सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली.
गोव्याचे कोकण रेल्वे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांनी सांगितले की, महिला प्रवासी झोपली असताना आरोपी तिच्याजवळ आला आणि तिच्या चेहऱ्यावर हस्तमैथुन करू लागला. महिलेसोबत प्रवास करणाऱ्या तिच्या दोन मित्रांनी आरोपीला हे करताना पाहिले. तेव्हा त्यांनी इमर्जन्सी नंबर डायल करून पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली.ही घटना कर्नाटकातील गोकर्ण रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रेय चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दत्तात्रेय हा महाराष्ट्राच्या सांगली येथील रहिवासी असून केरळच्या कन्नूर येथे नोकरी करतो. तर, पीडित महिला (वय, २२) एक्स्प्रेसमध्ये तिच्या दोन पुरुष मित्रांसह प्रवास करत असताना ही घटना घडली, अशी माहिती सुनील गुडलर यांनी दिली.
पीडित महिला सिनेमॅटोग्राफी करते आणि काही व्हिडिओ शूट करण्यासाठी केरळहून गोव्याला जात होते. पीडित महिला केरळमधील कोझिकोड येथील रहिवासी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात अटक करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.