Viral News: नराधमानं केली तब्बल ४२ महिलांची क्रूर हत्या! मृतदेह पोलीस ठाण्याजवळ फेकले! असा झाला हत्याकांडाचा उलगडा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: नराधमानं केली तब्बल ४२ महिलांची क्रूर हत्या! मृतदेह पोलीस ठाण्याजवळ फेकले! असा झाला हत्याकांडाचा उलगडा

Viral News: नराधमानं केली तब्बल ४२ महिलांची क्रूर हत्या! मृतदेह पोलीस ठाण्याजवळ फेकले! असा झाला हत्याकांडाचा उलगडा

Updated Jul 21, 2024 11:54 AM IST

Viral News : केनियाची राजधानी नैरोबीमध्ये एका नराधमां तब्बल ४२ महिलांची हत्या केली. त्यानं त्याच्या पत्नीचा देखील अत्यंत क्रूरपणे खून केला. सर्व मृतदेह त्याने पोलिस ठाण्याजवळ फेकून दिले.

नराधमानं केली तब्बल ४२ महिलांची क्रूर हत्या! मृतदेह फेकले पोलिस ठाण्याजवळ; असा झाला हत्याकांडाचा उलगडा, वाचा
नराधमानं केली तब्बल ४२ महिलांची क्रूर हत्या! मृतदेह फेकले पोलिस ठाण्याजवळ; असा झाला हत्याकांडाचा उलगडा, वाचा

Viral News : केनियाची राजधानी नैरोबीमध्ये एका विक्षिप्त सीरियल किलरनं तब्बल ४२ महिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. त्यानं त्याच्या पत्नीची देखील हत्या केली. पोलिसांना त्याच्या घरातून अनेक धक्कादायक गोष्टी देखील सापडल्या असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यानं दिलेल्या कबुली जबाबातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी पुढे आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार लोक कॉलिन्स जुमासी खालुशा असे आरोपीचे नाव असून त्याला 'व्हॅम्पायर' नावानं ओळखलं जातं. ३३ वर्षीय या आरोपीनं आतापर्यंत त्याच्या पत्नीसह ४२ महिलांची हत्या केली आहे. खून केल्यानंतर तो महिलांच्या मृतदेहाची विटंबना करायचा. त्या नंतर नायलॉनच्या गोणीत बांधायचा. व मृतदेह नैरोबी येथील पोलीस ठाण्याजवळील झोपडपट्टीत जाऊन फेकायचा. झडतीदरम्यान त्याच्या घरात बंका, रबरी हातमोजे, सेलोटेप आणि प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्या.

केनियामध्ये सध्या लिंग-आधारित हिंसाचार आणि राजकीय अनागोंदी दरम्यान, सिरियल किलींगची ही घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, विरोधकांनी सरकारवर महत्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी सरकार या प्रकरणाला महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नैरोबीमधील झोपडपट्टीत ९ सांगाडे सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. स्थानिक लोक येथे कचरा टाकत असत. खालुशा त्यात मृतदेह टाकायचा. खालुशाने महिलांना विविध आमिष दाखवून त्यांची हत्या करून फेकून दिल्याची कबुली दिली.

आरोपी खालुशाने त्याचा गुन्हा कबूल केल्या असल्याचं न्यायालयाला सांगण्यात आले. त्याने २०२२ पासून त्याच्या पत्नीसह ४२ महिलांची हत्या केली आहे. खालुशाच्या घरातून पोलिसांना अनेक मोबाईल फोन आणि ओळखपत्र सापडले. नायलॉनच्या गोण्या सापडल्या. खालुशाने केलेल्या खुनांमध्ये एका २६ वर्षीय जोसेफिन ओविनोचा नामक महिलेचा समावेश आहे. आरोपीने तिला फोन केला. यानंतर ती ती बेपत्ता झाली. तिची बहीण पॅरिस किया हिने तिचा शोध सुरू केला आणि नंतर कळले की तिचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आला होता.

फॉरेन्सिक तपासणीत असे दिसून आले की बहुतेक मृतदेहांचे धड काचऱ्याच्या ढीगाऱ्यात सापडले. परंतु त्यांचे शिर गायब होते. फक्त एक मृतदेह पूर्ण सापडला. एकाही मृतदेहावर मारहाणीच्या खुणा नव्हत्या. सर्व महिलांचा खून हा गळा दाबून करण्यात आला होता. या प्रकारामुळे केनिया पोलिसांवरही जोरदार टीका होत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, इतक्या दिवसांत पोलिसांना एकही हरवलेली महिला सापडली नाही किंवा सीरियल किलरचाही शोध लागला नाही. ज्या ठिकाणी मृतदेह फेकण्यात आले ते ठिकाण पोलीस ठाण्याच्या शेजारी आहे.

केनिया आधीच आर्थिक आणि राजकीय अनागोंदी मजली आहे. भ्रष्टाचार आणि करवाढीवरून नागरिकांनी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन केले आहे. अशा परिस्थितीत खालुशाच्या प्रकरणावरून प्रशासनाला लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवायचे असल्याची टीका केली जात आहे. खालुशाच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, त्याच्या मानसिक स्थितीचा आणि आरोग्याचा विचार करायला हवा. न्यायालयाने खालुशाच्या नजरकैदेची मुदत वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर