Barabanki school News: धक्कादायक! प्रार्थना सुरू असताना शाळेच्या बाल्कनीचा भाग कोसळला, ४० विद्यार्थी जखमी-40 students injured after first floor of barabanki school collapses ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Barabanki school News: धक्कादायक! प्रार्थना सुरू असताना शाळेच्या बाल्कनीचा भाग कोसळला, ४० विद्यार्थी जखमी

Barabanki school News: धक्कादायक! प्रार्थना सुरू असताना शाळेच्या बाल्कनीचा भाग कोसळला, ४० विद्यार्थी जखमी

Aug 23, 2024 04:08 PM IST

Barabanki School News: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील एका खाजगी शाळेत प्रार्थना सुरू असताना शाळेच्या बाल्कनीचा भाग कोसळून ४० विद्यार्थी जखमी झाली आहेत.

उत्तर प्रदेशात शाळेच्या बाल्कनीचा भाग कोसळल्याने ४० विद्यार्थी जखमी
उत्तर प्रदेशात शाळेच्या बाल्कनीचा भाग कोसळल्याने ४० विद्यार्थी जखमी

School Balcony collapses in Barabanki: लखनौच्या बाराबंकी जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी एका खासगी शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील व्हरांड्याचा मजला कोसळून आठ ते १५ वयोगटातील ४० मुले जखमी झाली आहेत. यातील २५ जखमी विद्यार्थ्यांवर जहांगीराबाद सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. तर, १५ जणांना जिल्हा रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती बाराबंकीचे जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत असून पहिल्या मजल्यावरील बाल्कनीचा भाग कोसळल्याने अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील आदेशापर्यंत शाळा सील करण्यात आली आहे. या घटनेमागील कारणांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेला जबाबदार असलेल्या शाळा प्रशासन आणि इतर लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी स्पष्ट केले आहे. जहांगीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवध अ‍ॅकॅडमी स्कूलमध्ये सकाळी ०८.०० वाजताच्या सुमारास विद्यार्थी सकाळच्या प्रार्थनेची तयारी करत असताना ही घटना घडली, अशी माहिती बाराबंकीचे पोलिस अधीक्षक दिनेश कुमार सिंह यांनी दिली.

शाळेच्या बाल्कनीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

या घटनेच्या तपासणीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. वजन जास्त झाल्यामुळे शाळेच्या पहिल्या मजल्याची बाल्कनी कोसळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या बाल्कनीचे बांधकाम निकृष्ट दर्जेचे होते. सकाळी सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रार्थनेसाठी रांगेत उभे असताना पहिल्या मजल्याच्या बाल्कनीचा भाग त्यांच्या अंगावर कोसळला. या घटनेनंतर शाळेत न आढळलेल्या शाळा व्यवस्थापक व इतर जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून निष्कर्षांनुसार त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचार देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी हेल्प डेस्कची स्थापना

विद्यार्थ्यांच्या पालकांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी शाळा आणि रुग्णालयात हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली. आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, या शाळेला दहावीपर्यंत संलग्नता आहे. मात्र, तरीही या शाळेत बारावीपर्यंत शिक्षण दिले जात आहे. याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

विभाग