चंडीगडमधील एका डॉक्टरला आपल्या आजोबांनी केलेल्या गुंतवणुकीचा चांगलाच फायदा झाला आहे. चंदीगडमधील डॉ. तन्मय मोतीवाला यांच्या आजोबांनी १९९४ मध्ये एसबीआयचे ५०० रुपये किंमतीचे शेअर खरेदी केले होते. शेअर खरेदी केल्यानंतर त्यांची विक्री करण्याचे ते विसरून गेले. त्यांनी या शेअरबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. डॉ. तन्मय यांचे आजोबा आता या जगात नाहीत. काही वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान आता ३० वर्षानंतर तन्मय यांना या शेअरचे सर्टिफिकेट मिळाले असून याची किंमत तब्बल ७५० पटीने वाढली आहे.
डॉ. तन्मय यांनी सोशल मीडियावर सांगितले की, त्यांना माहिती नव्हते की, त्यांच्या आजोबांनी हे शेअर खरेदी का केले होते व पुन्हा त्याची विक्री का केली नव्हती. त्यांनी सांगितले की, घरातील कागदपत्रे शोधताना त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले. त्यांनी सांगितले की, हे सर्टिफिकेट डीमॅटमध्ये बदलण्यासाठी पाठवले आहे. तन्मय यांच्या पोस्टवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. अनेक लोक जाणण्यास इच्छुक आहेत की, अखेर डॉ. तन्मय यांना किती पैसे मिळणार आहेत.
तन्मय यांनी सांगितले की, ही रक्कम जवळपास ३.७५ लाखाच्या जवळपास आहे. ही खूप मोठी रक्कम नाही, मात्र गेल्या ३० वर्षात ही रक्कम ७५० पटीने वाढली आहे. यामुळे ही रक्कम मोठी वाटत आहे. तन्मय यांनी सांगितले की, आता फिजिकल शेअरला डीमॅटमध्ये बदलण्यासाठी लांबलचक प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
डॉ. तन्मय यांनी सांगितले की, त्यांना सध्या पैशाची इतकी आवश्यकता नाही, त्यांनी ते शेअर विकणार नाहीत. त्यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या प्रकरणात लोकांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आम्हाला एका सल्लागाराची गरज आहे, जे आम्हाला या प्रक्रियेबाबत समजावून सांगतील व आमचे काम सोपे होईल. आजच्या जमान्यात भलेही ही रक्कम कमी वाटत असेल मात्र १९९४ मध्ये एका सरकारी शिक्षकालाही जवळपास ५०० रुपये पगार मिळत होता. आज एका सामान्य सरकारी शिक्षकाचे वेतन ४० हजार रुपये झाले आहे.