Kanpur: चोरट्यांनी हद्दच ओलांडली! चालवता येत नसतानाही मारुती व्हॅन चोरली, लढवली अनोखी शक्कल!
Kanpur Car Theft: उत्तर प्रदेशाच्या कानपूर येथे तीन मारुती व्हॅन चोरी केलेल्या तीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Uttar Pradesh Car Theft: उत्तर प्रदेशच्या कानपूर येथून चोरीचा अजब प्रकार समोर आला आहे. मारुती व्हॅन चोरण्यासाठी गेलेल्या तीन चोरट्यांपैकी एकालाही गाडी चालवता येत नसल्याने त्यांनी अनोखी शक्कल लढवून चोरी केली आहे. परंतु, काही तासातच पोलिसांनी तिन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांनी याआधी आणखी गाड्या चोरल्या आहेत का? याचाही पोलीस तपास करीत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
सत्यन कुमार, अमन गौतम आणि अमित वर्मा असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. सत्यम हा महाराजपूरमधल्या एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये बीटेक करत आहे. अमन हा डीबीएस कॉलेजमध्ये बीकॉमच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर, एका बिल्डिंगमध्ये काम करतो. दरम्यान, ७ मे २०२३ रोजी या तिघांनी दबौली परिसरातून एक मारुती व्हॅन चोरली. परंतु, त्यांच्यापैकी कोणालाही गाडी चालवता येत नसल्याने त्यांनी दबौलीपासून १० किलोमीटरपर्यंत गाडीला धक्का मारत कल्याणपूर येथे आणली. त्यानंतर गाडीची नंबर प्लेट बदलून गाडी लपवून ठेवली. ही गाडी भंगारात विकण्याचा तिघांचा प्लॅन होता, अशी माहिती एसीपी भेज नारायण सिंह यांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी (२३ मे २०२३) या तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांकडून चोरीच्या दोन मोटारसायकल्सही जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरी केलेल्या गाडी विकण्यासाठी एक वेबसाईट तयार केली जाणार होती.