Budgam bus accident : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) बस डोंगराळ रस्त्यावरून जात असताना दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जवान शहीद झाले आहेत. या अपघातात ३२ जवान जखमी झाले आहेत.
निवडणुकीच्या ड्युटीवर जात असताना हा अपघात झाला. ५२ सीटर बस आपल्या ताफ्यासह विधानसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यासाठी जात असताना बस दरीत कोसळली. बसमध्ये बीएसएफचे एकूण ३५ जवान होते. मध्य काश्मीरमधील ब्रेल वाटरहाल भागात हा अपघात झाला.
जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एक नागरिक चालक ही जखमी झाला आहे.
बीएसएफकडून दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक ड्यूटीवर जात असलेल्या बीएसएफ जवानांच्या बसला मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील वाटरहाल परिसरात अपघात झाला. बस दरीत कोसळल्याने दोन डझनहून अधिक जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील ब्रिल गावाजवळ डोंगराळ व वळणावळणाच्या रस्त्यावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस दरीत कोसळली.
या भीषण अपघातात २८ ते ३२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलीस आणि सैन्य दलाच्या जवानांनी मदत व बचाव कार्यास सुरुवात केली आहे.
३५ बीएसएफ जवानांना घेऊन जाणारी बस खोल गरीत कोसळल्यानंतर खडकांवर आदळली.बस उंचीवरून दगडांवर आदळल्यानंतर मोठा आवाज झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक लोक मदतीला धावले. अन्य गाडीतील जवान व स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू सुरू करून जखमी जवानांन दरीतून वर काढले व रुग्णालयात हलवले.
या अपघातात बसमधील बीएसएफचे सर्व जवान जखमी झाले आहेत. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जवानांना बसमधून बाहेर काढले.