South Korea Plane Crash News: दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर १८१ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले असून या दुर्घटनेत २८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती आपत्कालीन कार्यालयाने दिली आहे. बचाव अधिकारी विमानातून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाच्या मुआन शहरातील विमानतळावर उतरताना विमानाला आग लागली. या घटनेत आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाले आहेत. देशाच्या नैर्ऋत्येकडील विमानतळावर विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना पक्ष्यांच्या संपर्कामुळे लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे,अशी माहिती योनहाप वृत्तसंस्थेने रविवारी दिली. या विमानात सहा क्रू मेंबर्स आणि १७५ प्रवासी होते. या घटनेने विमानतळ परिसरात खळबळ माजली.
संबंधित बातम्या