molestation of a girl in spicejet flight : स्पाइसजेटच्या फ्लाइटमध्ये तिचा प्रियकर आणि त्याच्या कुटुंबासह प्रवास करणाऱ्या २६ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे एअरलाइन क्रू मेंबर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला विनयभंगाची तक्रार देण्यापासून रोखले. आरोपी मुलाने मुलीला वाईट हेतूने स्पर्श केल्याचे मान्य केले असूनही, विमानात उपस्थित एअरलाइन क्रू आणि बागडोगरा विमानतळावरील सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी त्याला तक्रार दाखल करू दिली नाही. त्यांनी या घटनेचा कोणताही पुरावा पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्याने त्या मुलाने मुलीची माफी मागून त्याला सोडून देण्यास सांगितले.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणारी एक मुलगी ही ३१ जानेवारी रोजी स्पाइसजेटच्या एसजी ५९२ या फ्लाइटने प्रवास करत होती. मुलीला तिचा प्रियकर, त्याची आई आणि आजारी वडिलांच्या मागे तीन जागा मिळाल्या. दरम्यान प्रियकराच्या आईने त्याला बाजूच्या सीटवर येण्यास सांगितले कारण तीनपैकी एकच जागा व्यापली होती. त्या सीटवर कोलकाता येथील कायद्याचे शिक्षण घेणारा एक विद्यार्थी बसला होता. त्याने तिच्यासोबत शिफ्ट होऊन महिलेला जागा देण्याचे मान्य केले. पण तो खिडकीच्या रिकाम्या सीटवर न जाता मधल्या सीटवर (स्त्रीच्या शेजारील सीट) बसला.
सकाळी ९.३० च्या सुमारास विमानाचे उड्डाण होताच मुलीने इअरफोन लावले आणि गाणी ऐकू लागली. टेकऑफ झाल्यानंतर काही वेळातच तिला त्या तरुणाने तिच्या डाव्या हाताला स्पर्श केल्याचे जाणवले. त्याचा हात सीटच्या आर्मरेस्टवर ठेवण्यात आला होता. मुलगी म्हणाली, "त्याने त्याचा उजवा हात माझ्या शेजारी आर्मरेस्टवर ठेवला. मी गाणी ऐकण्यात व्यस्त होते. दरम्यान, माझा हात दाबला जात आहे असे मला जाणवले. मी मुलाकडे पाहिल्यावर त्याची बोटे मला पुन्हा पुन्हा स्पर्श करत होती. सुरुवातीला मला वाटले की तो चुकून मला स्पर्श करत आहे. पण नंतर क्रू सदस्य जेवण देऊ लागल्यावर त्याने लगेच हात काढला."
जेवण दिल्यानंतर, मुलीच्या मांडीला तरुण स्पर्श करू लागला. यामुळे पीडित मुलगी ओरडली. तिचा आवाज ऐकून एक एअर होस्टेस तिच्याजवळ धावत आली. मुलीने तिच्यावरील प्रसंग सांगितला. यावेळी तरुणाने देखील त्याने असे केल्याचे मान्य करत माफी मागितली. मुलीने त्याच्या कांशीलात लागावली. मात्र, त्याला मारू नये असा इशारा एअर होस्टेसने केला. नंतर आरोपी मुलाची जागा बदलण्यात आली. मात्र, मुलीने मुलावर कारवाई करण्याचा आग्रह धरला. काही वेळातच पुरुष फ्लाइट अटेंडंट मुलीकडे आला. त्याने तिला धीर देण्याऐवजी तिलाच उलट जाब विचारला आणि तक्रार देऊ नये यासाठी दबाव देऊ लागला.
विमान उतरल्यानंतर एअरलाइन्सचे कर्मचारी आणि सीआयएसएफच्या जवानांनी मुलीला बाजूला घेतले. तो विद्यार्थी असल्याने त्याला सोडून देण्याचा सल्ला तिला देण्यात आला. तसेच तक्रार दाखल केल्यास दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागेल असेही उलट तरुणीला सांगण्यात आले. तरुणाने माफी मागितल्यानंतर त्याला सोडण्यात आले. यामुळे तरुणी निराश झाली.
एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, "बागडोगरा येथे पोहोचल्यावर, दोघांना स्पाइसजेटच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मदत केली आणि आगमन क्षेत्रात सीआयएसएफ अधिकाऱ्यांकडे नेले. पीडित मुलीने कारवाईची मागणी केली. आरोपीने माफी मागितली आणि पीडित महिला प्रवाशाने कोणतीही तक्रार न करता तेथून निघून गेली.
संबंधित बातम्या