Viral Story: सोशल मीडिया हे एक अनोखे प्लॅटफॉर्म आहे, जिथे कधी काही व्हायरल होईल, याचा नेम नाही. गंमतीशीर व्हिडिओव्यतिरिक्त अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. असाच एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एका कर्मचाऱ्याने आपल्या मालकाला अर्ध्या दिवसाच्या सुट्टीसाठी मेसेज केला आहे. हा मेसेज वाचून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. कर्मचारी आणि मालकाच्या संभाषणाचा स्क्रिनशॉट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. या स्क्रिनशॉटवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पहिला मेसेज कर्मचाऱ्याचा आहे, जो त्याने त्याच्या मालकाला पाठवला आहे. कर्मचाऱ्याने लिहिले आहे की, 'मला शनिवारी अर्धा दिवस सुट्टी हवी आहे. मला माहित आहे की, प्रोजेक्टच्या कामामुळे हे शक्य नाही. परंतु, मला कुटुंबासह एका कार्यक्रमाला जायचे आहे.' यानंतर मालकाने आपल्या उत्तरात कृपया अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊ नका, अशी विनंती केली. पुढे कर्मचाऱ्याने केलेला मेसेज पाहून सगळेच शॉक झाले. कर्मचाऱ्याने म्हटले की, 'मॅडम, मला अर्ध्या दिवसाची सुट्टी हवी आहे. नाहीतर, माझी आई मला जिवंत सोडणार नाही.' कर्मचारी आणि मालकामधील संभाषणाचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
@crankyranterr नावाचा ट्विटर अकाऊंटवरून हा स्क्रिनशॉट शेअर करण्यात आला आहे. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, 'कल्पना करा की तुम्ही २५ वर्षांचे आहात आणि तरीही आईला नकार देऊ शकत नाही.' आतापर्यंत लाखो लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. या पोस्टवर एका युजरने गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. 'कर्मचारी आणि मालक यांच्यातील संभाषण मला क्यूट वाटले.' दुसऱ्याने असे म्हटले आहे की, 'मी देखील काल असेच केले.'