मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Women Found Died: २२ वर्षीय महिला राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ, पती बेपत्ता!

Women Found Died: २२ वर्षीय महिला राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ, पती बेपत्ता!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 18, 2024 05:36 AM IST

Women Found Died at Home: ग्रेटर नोएडा परिसरात राहत्या घरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे.

Crime (Representational image)
Crime (Representational image)

22 Year Old Woman Found Dead: ग्रेटर नोएडाच्या तुगलपूर गावात एका २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह मंगळवारी रात्री तिच्या राहत्या घरी आढळून आला. पती आणि सासरचे लोक जास्त हुंडा देण्यासाठी दबाव टाकत असून हुंड्यासाठी तिची हत्या करण्यात आली असावी, असा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.

अतिरिक्त पोलिस उपायुक्त अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठच्या सुमारास स्थानिक पोलिसांना डायल ११२ चा फोन आला की, परिसरातील एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच नॉलेज पार्क पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घरमालक बीरम सिंह यांनी सांगितले की, फ्लॅट बंद असल्याचे त्यांनी पाहिले. परंतु, भाडेकरूंनी त्यांना आपण घर सोडून जात असल्याचे सांगितले नाही. यामुळे घरमालकाने डुप्लिकेट चावीने फ्लॅट उघडला असता त्यांना महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांना मृत महिलेच्या गळ्याभोवती गळा दाबण्याच्या खुणा आढळल्या. तिला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, अशी माहिती समोर आली.

रचना तेजेंद्र कुमारी असे मृत महिलेचे नाव असून ती मूळची आग्रा येथील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी तेजेंद्रशी तिचे लग्न झाले. सहा दिवसांपूर्वी ते भाड्याच्या घरात राहायला आले. महिलेचा पती आणि सासरचे लोक हुंड्यासाठी तिच्या दबाव टाकत होते आणि हुंड्यासाठी तिची हत्या करण्यात आली असावी, असा आरोप त्यांनी केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या महिलेचा पती बेपत्ता आहे.

मृत महिलेचा मृत्यू मोबाईल बंद असून तो बेपत्ता आहे. त्यानेच पत्नीची हत्या केली असा असावी, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आली. संबंधित तरतुदींनुसार हत्या आणि हुंड्याशी संबंधित गुन्ह्यांसाठी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग