Gold scam in kedarnath: केदारनाथ धाममध्ये २२८ किलो सोन्याचा घोटाळा, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा गंभीर आरोप, VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gold scam in kedarnath: केदारनाथ धाममध्ये २२८ किलो सोन्याचा घोटाळा, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा गंभीर आरोप, VIDEO

Gold scam in kedarnath: केदारनाथ धाममध्ये २२८ किलो सोन्याचा घोटाळा, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा गंभीर आरोप, VIDEO

Updated Jul 15, 2024 07:01 PM IST

Gold scam in kedarnath : शंकराचार्यांनी म्हटले की, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. यावर का आवाज उठवला जात नाही?तेथे घोटाळा केल्यानंतर आता दिल्लीत केदारनाथ बनत आहे?आता आणखी एक घोटाळा होईल.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा   केदारनाथ मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा केदारनाथ मंदिर ट्रस्टवर गंभीर आरोप

ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केदारनाथ धाममध्ये२२८किलो सोन्याचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सोमवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानावरून निघाल्यानंतर हा आरोप केला. मीडियाने त्यांना विचारले होते की, दिल्लीमध्ये केदारनाथ धाम सारखे मंदिर बनवले जात आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे?यावर शंकराचार्यांनी म्हटले की, द्वादश ज्योतिर्लिंगांची एक परिभाषा आणि नियम निश्चित आहेत. त्यामुळे कोठेही केदारनाथ धाम बनवला जाऊ शकत नाही. शंकराचार्यांनी म्हटले की, शास्त्रांमध्येद्वादश ज्योतिर्लिंगाचे वर्णय केले आहे. केदारनाथ धाम दिल्लीत बनवला जाईल, असे म्हणणे चुकीचे आहे. आमच्या धार्मिक स्थळांमध्ये राजकारणाचा प्रवेश झाला आहे. हे चुकीचे आहे. केदारनाथ धाममध्ये २२८ किलो सोन्याचा घोटाळा झाला आहे. याचा तपास का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शंकराचार्यांनी यावेळी अनंत अंबानी यांच्या विवाह समारंभात पंतप्रधान मोदींची भेट झाल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, पीएम नरेंद्र मोदींनी मला प्रणाम केला, मीही त्यांना आशीर्वाद दिला. आम्ही त्यांचे शत्रू नाही तर हितचिंतक आहे. जेव्हा ते चुकीचे करतात तेव्हा आम्ही स्पष्ट सांगतो की, येथे चूक झाली आहे. शंकराचार्यांनी म्हटले की, शास्त्रांमध्ये लिहिले आहे की, सोमनाथ सौराष्ट्र म्हणजे गुजरातमध्ये असेल. केदारनाथ हिमालयात असेल. याला कोणता पर्याय असू शकत नाही. जर आम्ही हे दिल्लीत बनवण्याचा प्रयत्न करू तर ते चुकीचे होईल. केदारनाथ एकच आहे व जेथे आहे, तेथेत राहील.

शंकराचार्यांनी म्हटले की, केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. यावर का आवाज उठवला जात नाही? तेथे घोटाळा केल्यानंतर आता दिल्लीत केदारनाथ बनत आहे? आता आणखी एक घोटाळा होईल. गेल्यावर्षी केदारनाथ धामच्या एका पुजाऱ्याने आरोप केला होता की, १२५ कोटी रुपयांच्या सोन्याचा घोटाळा झाला आहे. हे सोने मंदिरावर चढवले जाणार होते. मात्र त्याजागी तांब्याचा वापर केला गेला. मात्र या आरोपांचे मंदिर समितीने खंडन केले होते. आज पुन्हा असे आरोप शंकराचार्यांनी लावले आहेत. त्यांनी म्हटले की, केदारनाथमधून २२८किलो सोने गायब आहे. यासाठी कोण जबाबदार आहे.

 

मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी दिल्लीत केले मंदिराचे भूमिपूजन -

गेल्या बुधवारी दिल्लीतील बुराडी येथे केदारनाथ मंदिराचे भूमिपूजन केले होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते. याच्या विरोधात केदारनाथ धाममधील पुजाऱ्यांनी आंदोलन केले होते. पुजाऱ्यांचे म्हणणे होते की, हे चुकीचे आहे. केदार सभेचे प्रवक्ते पंकज शुक्ला यांनी म्हटले की, आम्ही मंदिर निर्माणाच्या विरोधात नाही. मात्र केदारनाथ धाम सारखेच मंदिर बनवणे योग्य नाही. जर केदारनाथ धाम परिसरातील एक दगड जरी तिकडे नेला तर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धामाचे महत्व कमी होईल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर