मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Thailand : थायलंड हादरले ! पाळणाघरातील गोळीबारात ३४ चिमुकले ठार; आरोपीची आत्महत्या

Thailand : थायलंड हादरले ! पाळणाघरातील गोळीबारात ३४ चिमुकले ठार; आरोपीची आत्महत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 06, 2022 03:33 PM IST

Thailand Day-care Centre Shooting : अमेरिकेत पहाटे झालेल्या गोलिबारात काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच थायलंड येथेही अशाच प्रकारची घटना घडली. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने पाळणा घरात केलेल्या गोळीबारात तब्बल २२ चिमूरड्यांसह काहीनागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Thailand Day-care Centre Shooting
Thailand Day-care Centre Shooting

थायलंडच्या पूर्वोत्तरी शहरात एका माथेफिरू माजी पोलिसाने एका पाळणा घरात केलेल्या गोळीबाराने तब्बल ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तब्बल २३ लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या माथेफिरू माजी पोलीस कर्मचाऱ्याने दुपारच्यावेळी पाळणाघरात बेछुट गोळीबार केला.गोलिबारानंतर त्याने त्याच्या जवळील चाकूनेही हल्ला केला. यात अनेक लहान मुलांचा गोळी लागून किंवा चाकून भोसकल्याने मृत्यू झाला. तब्बल २३ मुले, दोन शिक्षण आणि एका पोलिस अधिकाऱ्याचा मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेनंतर आरोपीने देखील स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.

हल्लेखोर माजी पोलिस हा पांढऱ्या रंगाच्या गाडीतून शाळेजवळ आला. या गाडीवर बँकॉक येथील नंबर प्लेट आहे. पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये २३ मुलांचा समावेश आहे. थायलंडमध्ये यापूर्वी २०२० मध्ये अशीच एक गोलिबाराची घटना घडली होती. यात एका सैनिकाने नाखोन रैचसिमा शहरात गोळीबार केला होता. यात २१ नगिरकांचा मृत्यू झाला होता.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ले खोऱ्याने त्याची पत्नी आणि मुलाला देखील गोळी मारली आहे. यानंतर त्याने स्वत: वर गोळी झाडली. या संदर्भात ठोस माहिती मिळू शकलेली नाही. प्रधानमंत्री यांनी या घटनेचा निषेध केला असून कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेनंतर नोंग बुआ लांफू शहरात लष्कराला अलर्ट देण्यात आला आहे. सध्या या परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग