Kumbh Melamnhvb Viral News: व्हायरल गर्ल मोनालिसानंतर महाकुंभातील आणखी एक तरुणी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या तरुणीने साध्वी बनण्यासाठी चक्क एअर होस्टेसची लाखो रुपयांच्या नोकरीला लाथ मारली, असा दावा केला जात आहे. मनाला समाधान मिळेल, अशाच गोष्टी करायला पाहिजेत, असा सल्ला देखील या तरुणीने दिला.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या करण्यात आलेल्या व्हिडिओत संबंधित तरुणीला लाखो रुपयांची नोकरी सोडून साध्वी का व्हायचे आहे असे विचारण्यात आले. यावर तरुणीने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ती म्हणाली की, एअर होस्टेस होणे अनेक मुलींचे स्वप्न आहे. परंतु, मनाला धार्मिक गोष्टींमध्ये आनंद मिळत असेल तर, त्या दिशेने वाटचाल करायला हवी. तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. काही जण म्हणतात की, हे सर्व प्रसिद्धी मिळवण्यासाठी केले जात आहे. तर, काहींनी म्हटले आहे की, हर्षानंतर आता सगळ्याच मुलींना साध्वी बनून व्हायरल व्हायचे आहे. परंतु, हर्षाने आपल्या एका व्हिडिओत ती साधू नसल्याचे स्पष्ट केले होते. फक्त ती साध्वीचा पोशाख घालून कुंभमेळ्याला आली होती.
हर्षा रिचारिया व्यवसायाने मॉडेल आणि होस्ट आहे. पण महाकुंभाला आल्यानंतर ती तितकी प्रसिद्ध झाली नाही. हर्षाने ग्लॅमर जग सोडून साध्वी बनण्याचा निर्णय घेतला आणि तिला सर्वात सुंदर साध्वीचा टॅग देखील मिळाला. पण तिला इतके ट्रोल केले गेले की, तिला महाकुंभ मधेच सोडावा लागला.
या यादीतील पुढचे नाव आयआयटीयन बाबा अभय सिंग यांचे आहे. तो इतका सुशिक्षित आहे की, जेव्हा त्याने त्याच्या शिक्षणाबद्दल पत्रकाराला सांगितले तेव्हा तोही क्षणभर स्तब्ध झाला. आयआयटीयन बाबांनी महाकुंभमेळ्यात त्यांची संपूर्ण कहाणी सांगितली आणि त्यांनी अभियांत्रिकीची नोकरी सोडून मोक्षाच्या मार्गावर कसे निघाले हे सांगितले.
महाकुंभ २०२५ मध्ये आणखी एक व्यक्ती आहे, जी एका रात्रीत इतकी व्हायरल झाली आहे की, ज्याला काटे वाले बाबा म्हणून ओळखले जाते. रमेश कुमार मांझी असे काटे वाले बाबाचे नाव असून ते बिहारमधील कटिहार येथील रहिवाशी आहेत.
महाकुंभात आणखी एक बाबा आला आहे, जो अनाज वाले बाबा या नावाने प्रसिद्ध आहे. या बाबाने आपल्या डोक्यावर गहू, तांदूळ, बार्ली आणि बाजरी अशी धान्ये पेरली आहेत.
संबंधित बातम्या