महिन्याभरात ५ हत्या आणि ३ बलात्कार; सिरिअल किलरला पकडण्यात पोलिसांना यश, अशा महिलांना करायचा टार्गेट
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महिन्याभरात ५ हत्या आणि ३ बलात्कार; सिरिअल किलरला पकडण्यात पोलिसांना यश, अशा महिलांना करायचा टार्गेट

महिन्याभरात ५ हत्या आणि ३ बलात्कार; सिरिअल किलरला पकडण्यात पोलिसांना यश, अशा महिलांना करायचा टार्गेट

Updated Nov 29, 2024 06:21 PM IST

serial killer arrested in gujarat: गुजरातमध्ये १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले. हा आरोपी सीरिअल कीलर असल्याचे तपासात उघड झाले. या आरोपीने महिन्याभरात ५ जणांची हत्या केली.

महिन्याभरात ५ हत्या आणि ३ बलात्कार; सिरियल किलरला पकडण्यात पोलिसांना यश
महिन्याभरात ५ हत्या आणि ३ बलात्कार; सिरियल किलरला पकडण्यात पोलिसांना यश

Gujarat Serial killer: गुजरातमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आरोपीबाबत धक्कादायक खुलासे झाले. गुजरात पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, आरोपी सिरियल किलर आहे. आरोपीने गेल्या महिन्याभरात पाच हत्या आणि तीन बलात्कार केल्याची चौकशीत उघड झाले. याशिवाय, इतर गुन्ह्यांमध्ये त्याचा प्रामुख्याने सहभाग आहे. राहुल कर्मवीर जाट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

सहा राज्यांच्या पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांतील सुमारे दोन हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे स्कॅनिंग केल्यानंतर आरोपी राहुल कर्मवीर जाट याला २४ नोव्हेंबर रोजी गुजरातमधील वलसाडमधील वापी रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. आरोपी विशेषत: अपंग डबे आणि रेल्वेच्या महिला डब्यातील एकट्या प्रवाशांना लक्ष्य करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपी राहुल जाट हा मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे. वलसाडचे पोलिस अधीक्षक करणराज वाघेला यांनी सांगितले की, वांद्रे-भुज ट्रेनमधून प्रवास करत असताना पोलिसांनी सीरिअल किलरला पकडले. दरम्यान, वलसाड जिल्ह्यातील उदवाडा रेल्वे स्थानकाजवळ १४ नोव्हेंबर रोजी १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेच्या मृतदेहाच्या फॉरेन्सिक तपासणीत बलात्काराची पुष्टी होताच पोलिसांनी अनेक तपास पथके तयार केली आणि २००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी महिलेचा मृतदेह सापडलेल्या भागात कपडे घालताना दिसला. वापी रेल्वे स्थानकात संशयिताच्या लंगडेपणावरून पोलीस पथकाने त्याची ओळख पटवली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये आरोपी रेल्वे स्थानकावर काहीतरी खाताना दिसला. आरोपींची ओळख पटल्यानंतर गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या पोलिस दलाने संयुक्त मोहीम हाती घेतली. त्याने अनेक राज्यात अनेक हत्या केल्याची तपासात निष्पन्न झाले.

वलसाडच्या एसपीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी २५ ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील बेंगळुरू-मुर्देश्वर ट्रेनमध्ये सिगारेटच्या वादातून सहप्रवाशाची हत्या केली होती. पश्चिम बंगालमध्ये १९ नोव्हेंबर रोजी कटिहार एक्स्प्रेसमध्ये त्याने एका ६३ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या केली होती. अटकेच्या काही दिवस आधी त्याने २४ नोव्हेंबर रोजी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर मंगलोर स्पेशल एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची हत्या केली होती.

वाघेला यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०१४ मध्ये सोलापूरजवळ पुणे-कन्याकुमारी ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील रहिवासी राहुल कर्मवीर जाट याने इयत्ता पाचवीत शाळा सोडली होती. त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा अपंग असून त्याने आपल्या आजारपणाचा गैरफायदा घेत रेल्वेत खुलेआम प्रवास केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर