Sabarmati Express derail : वाराणसीहून अहमदाबादला जाणारी १९१६८ साबरमती एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. ही गाडी रात्री अडीचच्या सुमारास भीमसेन स्थानकाजवळ रुळावरून घसरली. या गाडीचे २० डब्बे हे रुळावरून खाली घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित आहे. प्रथमदर्शनी एक मोठा दगड इंजिनवर आदळला व यानंतर ही गाडी रुळावरून घरसल्याची माहिती आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, दगडलागल्यामुळे इंजिनचा कॅटल गार्ड खराब झाला व गाडी ही रुळावरून घसरली. या घटनेनंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केले आहेत.
सहाय्यक व्यावसायिक व्यवस्थापक संतोष कुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, आपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी वाहने पाठवण्यात आली आहे. सध्या या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून ती वळवण्यात आली आहे. अपघातग्रस्त गाडीचे डब्बे हे बाजूला केले जात आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रयागराज विभागाचे डीआरएमही घटनास्थळी पोहोचले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसने कानपूरला पाठवले जात आहे. अपघातस्थळ आणि नियंत्रण कार्यालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. अपघात निवारण वाहनही रवाना झाले आहे.
प्रयागराज ०५३२-२४०८१२८, ०५३२-२४०७३५३
कानपूर ०५१२-२३२३०१८, ०५१२-२३२३०१५
मिर्झापूर ०५४४२२२०००९७
इटावा ७५२५००१२४९
टुंडला ७३९२९६९७०२
अहमदाबाद ०७९२२११३९७७
बनारस शहर ८३३०३९९४४१११
कानपूर सेंट्रल स्थानकातून सुटल्यानंतर सुमारे ३० मिनिटांनी भीमसेनजवळ शनिवारी पहाटे २ वाजून २९ मिनिटांनी रेल्वे रुळावरून घसरली.
इंजिनवर दगड आदळल्याने गर्डर वाकला. यामुळे रेल्वेचे इंजिन रुळावरून खाली उतरले. व संपूर्ण गाडी ही रुळावरून घसरली. रेल्वे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोको पायलटने सांगितले की, इंजिनच्या गुरांच्या गार्डवर अचानक मोठे दगड पडले. दगडांमुळे हा गार्ड वाकला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचं सांगण्यात आलं आहे.
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमुळे या मार्गावर धावणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आल्या असून तीन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
१ वाराणसी जंक्शन - लखनौ जंक्शन ट्रेन ०१८२३/०१८२४
२. ट्रेन १११०९ वाराणसी जंक्शन - लखीमपूर
३. ट्रेन १४११०/१४१० कानपूर - चित्रकूटधाम
४. गाडी क्रमांक ०४१४३ (कुरेगाव - कानपूर)
५. ट्रेन ०४१४४१ (कानपूर - कुरेगाव)
ट्रेन ०५३२६ (लोकमान्य टिळक - गोरखपूर) वाराणसी जंक्शन - ग्वाल्हेर - बीना - इटावा - कानपूर
०१८८९/०१८९० (ग्वाल्हेर - बीना)
ट्रेन ११११० (लखीमपूर - वाराणसी जंक्शन) सध्या गोरखपूर येथे, गोरखपूर - इटावा - बीना - ग्वाल्हेर - वाराणसी जंक्शन मार्गे वळवली आहे.
ट्रेन २२५३७ (गोरखपूर - लोकमान्य टिळक) कानपूर येथून वळवण्यात आली आहे. ही गाडी गोरखपूर - वाराणसी जंक्शनमार्गे वळविण्यात आली.