जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या चकमकीची माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने बुधवारी दिली. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून परिसरात संयुक्त कारवाई अजूनही सुरूच आहे.
सोपोरच्या हदीपोरा भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू केली गेली.
दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर #IndianArmy अँड @JmuKmrPolice आज पीडी सोपोरमधील हादीपोरा भागात संयुक्त मोहीम हाती घेतली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, केला असून ऑपरेशन सुरू आहे,' असे चिनार कॉर्प्सने एक्सवर पोस्ट केले आहे.
काश्मीर झोन पोलिसांनी एक्सवर पोस्ट केले होते, "पीडी सोपोरच्या हादीपोरा भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल कामाला लागले आहेत. त्यानंतर अधिक माहिती दिली जाईल.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीच्या ठिकाणी दोन मृतदेह दिसले आहेत, परंतु अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. दशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस आणि लष्कराचा एक जवान असे दोन जवान जखमी झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातील बुफलियाज सेक्टरमधील मरहा फॉरेस्ट परिसरात गोळीबाराचा आवाज ऐकू आल्याने सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या एक दिवस आधी ही घटना घडली. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर (एसकेआयसीसी) येथे २० जून रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या एका कार्यक्रमात ते सहभागी होतील. ते केंद्रशासित प्रदेशातील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील करतील.
२१ जून रोजी पंतप्रधान मोदी एसकेआयसीसीमध्ये १० व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील आणि तेथे उपस्थितांना संबोधित करतील.
नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बिहारमधील राजगीर येथे हजेरी लावली. मोदींसह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. मात्र, उद्घाटन समारंभादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार हे मोदींचा हात धरून काहीतरी पाहू लागले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.