जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले, तर तीन जवान जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीर जिल्यातील कोकेरनाग परिसरातील अहलान गडोले भागात घेराबंदी करत शोधमोहीम राबवली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारानंतर जोरदार चकमक उडाली.
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी दहशतवादी व सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत तर तीन जण जखमी झाले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग भागात भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांनी संयुक्त मोहीम सुरू केली.
कोकेरनाग परिसरातील दुर्गम भाग असलेल्या घनदाट अहलान गागरमांडू जंगलात ही चकमक झाली. सुरक्षा दलांनी घेराव घालून शोधमोहीम राबविली असता जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी येणाऱ्या शोध पथकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
त्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान जखमी झाले असून त्यांना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे दोघांचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात बंदोबस्त पाठविण्यात आला असून शेवटचे वृत्त मिळेपर्यंत दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्याची मोहीम सुरू होती. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्सवर पोस्ट केले की, "गुप्त माहितीच्या आधारे #IndianArmy, @JmuKmrPolice आणि @crpf_srinagar यांनी आज अनंतनागमधील सामान्य भाग कोकेरनागमध्ये संयुक्त ऑपरेशन सुरू केले. संपर्क प्रस्थापित झाला आणि गोळीबार सुरू झाला. दोन कर्मचारी जखमी झाले असून त्यांना या भागातून बाहेर काढण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेल्या कारवाईत दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती लष्कराने दिली आहे. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली असून त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.
सांगितले जात आहे की, दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे व दारू गोळा आहे. तसेच हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित आहेत. रिपोर्ट्सनुसार हे दहशतवादी डोडा ते दक्षिण काश्मीरमधील जंगलात घुसखोरी करण्यात यशस्वी झाले होते. घनदाट जंगल व दुर्गम तसेच डोंगराळ परिसर असल्याने दहशतवादी पळून जाण्याची शक्यता आहे. मात्र सुरक्षा दलांनी परिसराची व्यापक घेराबंदी करत शोधमोहीम तीव्र केली आहे. या चकमकीत दहशतवादी सुरक्षा दलाच्या समोर आल्यानंतर घनदाट जंगलात पळून गेले. सुरक्षा दलाकडून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.