Viral News: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, याचा नेम नाही. अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, जो एका गर्ल्स हॉस्टेलमधील आहे. अनेक तरुणींसमोर दोन मुली बॉलीवूडच्या गाण्यांवर नाचताना दिसत आहेत. या तरुणी ज्या पद्धतीने नाचत आहेत, त्यांना पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
या व्हिडिओत असे दिसत आहे की, बॉलिवूडमध्ये सुपरहिट सिनेमा धूम ३ चित्रपटातील 'कमली कमली' या गाण्यावर दोन तरुणी नाचताना दिसत आहेत. या दोन्ही तरुणीं चक्क कतरिना कैफ हिला टक्कर देत आहेत. या गाण्यावर दोन्ही तरुणी ज्या पद्धतीने नाचत आहेत ते पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. गर्ल्स हॉस्टेलमधील या व्हिडिओला मोठी पसंती दर्शवली जात आहे.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की, रिॲलिटी शोमध्येही असा डान्स पाहायला मिळत नाही. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, या दोन्ही तरुणींनी खूप छान डान्स केला आहे. तिसऱ्या युजरने आपल्या आठवणींना उजाळा देत असे म्हटले आहे की, हे तेच दिवस आहेत, जे आयुष्यात पुढे आठवत असतात. तर, काही लोकांनी आपण हॉस्टेलमध्ये शिकायला जातो की, नाचायला? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
याआधी सोशल मीडियावर शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते चालत्या बसमध्ये बीयर पिताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ तामिळनाडूतील चेंगलपट्टी जिल्ह्यातील आहे.एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ विद्यार्थ्यांपैकी एकाने शूट केला करून सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. हा व्हिडिओ जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर कारवाई करण्यात आली. हे प्रकरण स्थानिक पोलिसांवर सोपवण्यात आले. तसेच तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत काही विद्यार्थिनींनी बीयर प्यायल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान हा प्रकार घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून जबाब गोळा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. मिळालेल्या महितीनुसार, हा व्हिडिओ मस्तुरी परिसरातील भाटचौरा गावातील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील असून तो २९ जुलै रोजी शूट करण्यात आला आहे, असे समजत आहे.