मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ऑनलाइन गेम खेळता खेळता अल्पवयीन मुलीवर व्हर्च्युअल गँगरेप; काय आहे हा भयंकर प्रकार?

ऑनलाइन गेम खेळता खेळता अल्पवयीन मुलीवर व्हर्च्युअल गँगरेप; काय आहे हा भयंकर प्रकार?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 03, 2024 01:59 PM IST

UK Girl Virtually Gang-Raped: ब्रिटेनमध्ये एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट वापरून मेटाव्हर्स गेम खेळत असतांना सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

UK Girl Virtually Gang-Raped
UK Girl Virtually Gang-Raped

online virtual gang-rape : तंत्रज्ञानाच्या या युगात कोर्टात ऑनलाइन सुनावणी, ऑनलाइन पोलिस एफआयआर, लग्न, पूजा तसेचे अनेक ऑनलाइन फ्रॉड देखील होत असल्याच्या घटना रोज उघडकीस येत असतात. मात्र, आता ऑनलाइन पद्धतीने सामूहिक बलात्कार करण्याच्या घटना देखील उघकडीस येत आहे. अशीच एक घटना ब्रिटेनमध्ये उघडकीस आली असून एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ऑनलाइन गेम खेळता खेळता सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत. सध्या ही मुलगी मानसिक धक्क्यात आहे. या घटनांमुळे खळबळ उडाली आहे.

पत्नीच्या अफेअरचा पतीनं केला भंडाफोड; लॉजवर जात रूमचा दरवाजा तोडला, नको त्या अवस्थेत प्रियकराबरोबर दिसली पत्नी

आपण ज्या जगात राहतो त्या जगाशिवाय आणखी एक जग आता माणसांनीच विकसित केलं आहे ते आभासी जग म्हणजे व्हर्च्युअल वर्ल्ड. हे एक असं जग आहे, जिथं आपण प्रत्यक्षात नसतो पण तरी आपल्यासोबत सर्व प्रत्यक्षात घडतं आहे असंच वाटतं. पण आता भौतिक जगाप्रमाणे हे आभासी जगही महिलांसाठी सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ब्रिटीश वृत्तपत्र डेली मेलच्या वृत्तानुसार, ब्रिटीश पोलीस सध्या एका प्रकरणाची चौकशी करत आहेत, ज्यामध्ये मेटाव्हर्स गेममध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) अवतारासह ही मुलगी ऑनलाइन गेम खेळत होती. यावेळी मेटोवर्समध्ये असलेल्या इतर युझर्सने तिच्या अवताराचं लैंगिक शोषण आणि सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी एका इमर्सिव्ह गेममध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) हेडसेट वापरत होती जेव्हा तिच्या अवतारवर इतर पुरुष प्रतिनिधित्व करणाऱ्या अवतारांनी सामूहिक बलात्कार केला.

solapur road : पुणे सोलापूर रस्त्यावरील अतिक्रमणे सात दिवसात काढा! अन्यथा हातोडा; राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे आदेश

डेली मेलच्या वृत्तानुसार, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित मुलीला शारीरिक इजा झाली नसली तरी तिच्यावर मानसिक, भावनिक आघात झाला आहे. तपास यंत्रणेने याची गांभीर्याने दखल घेतली असून याचा सखोल तपास केला जात आहे.

ब्रिटनचे गृहसचिव जेम्स क्लेव्हरली यांनी या तपासाचे समर्थन केले आहे. पीडित मुलीला झालेल्या मानसिक आणि मानसिक आघातावर भर देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी असे आभासी गुन्हे गांभीर्याने घेण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. या प्रकारांकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा देखील देण्यात आला आहे.

'ही' आयटी कंपनी बनवणार कर्मचाऱ्यांना मालक; याआधी केलंय १५० कारचे वाटप

एलबीसीच्या "निक फेरारी अॅट ब्रेकफास्ट" कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले, हे प्रकरण वास्तविक नाही म्हणून त्याला दुर्लक्षित करणे सोपे आहे. परंतु आता अशा आभासी वातावरणात देखील या सारखे गुन्हे होऊ शकतात हे महिलांच्या दृष्टीने गंभीर आहे. ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे या घटना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. ही मुलगी या ऑनलाइन गेममुळे लैंगिक आघातातून गेली आहे. तिच्यावर त्याचा गंभीर आणि खोल मानसिक परिणाम झाला आहे. त्यामुळे अशी प्रकरणे फेटाळताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

नॅशनल पोलिस चीफ्स कौन्सिलचे इयान क्रिचले यांनी देखील मेटाव्हर्सबद्दल बोलले तसेच या गेमवर होणाऱ्या आभासी गुन्हेगारीच्या संभाव्यतेवर कठोर पावले उचलण्याची मागणी केली. ऑनलाइन गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी नवे धोरण विकसित करण्याचे देखील त्यांनी सांगितले. टेक कंपन्यांना वापरकर्त्यांसाठी सुरक्षा उपाय योजना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ऑनलाइन गेम, Horizon Worlds, हे मेटाने (पूर्वी Facebook म्हणून ओळखले जाणारे) विकसित केलेल्या ऑनलाइन गेम आहे. या पूर्वीही या व्हरच्युअल गेमवर लैंगिक शोषणाच्या घटना घडल्या आहेत. असे असतांनाही इंग्लंडमध्ये आजपर्यंत या घटनांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. अशीच एक घटना २०२२मध्ये देखील घडली होती. यात एका ४३ वर्षीय ब्रिटीश महिलेवर ऑनलाइन बलात्कार करण्यात आला होता. ही महिला एका कंपनीत मेटावर्स रिसर्चची उपाध्यक्ष म्हणून काम करते. मेटावर्समध्ये जाताच ६० सेकंदाच तिच्यावर गँगरेप झाला, असं तिनं सांगितलं. महिलेला हे सर्व इतकं वास्तविक वाटलं की तिने भीतीने आपला हेडफोनही तोडून फेकून दिला होता.

 

WhatsApp channel

विभाग