मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Railway : महत्त्वाची बातमी! पुण्यातून दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या १६ गाड्या २५ दिवस रद्द; 'हे' आहे कारण

Indian Railway : महत्त्वाची बातमी! पुण्यातून दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या १६ गाड्या २५ दिवस रद्द; 'हे' आहे कारण

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 11, 2024 10:04 AM IST

Sixteen express trains departing from Pune cancelled : पुण्याहून दक्षिण भारत आणि उत्तर भारतात जाणाऱ्या तब्बल १६ गाड्या या पुढील २५ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. उत्तरेत जाणारी जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस ही गाडी देखील रद्द करण्यात आली आहे.

sixteen express trains departing from pune cancelled
sixteen express trains departing from pune cancelled (MINT_PRINT)

sixteen express trains departing from pune cancelled : पुण्याहून उत्तरेत आणि दक्षिणेत जाणाऱ्या महत्वाच्या गाड्या या पुढील २५ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. आग्रा विभागातील पलवन-मथुरा जंक्शन येथे यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. या कामामुळे पुण्यातून सुटणाऱ्या १६ एक्स्प्रेस गाड्या प्रभावित झाल्या असून या गाड्या १० फेब्रुवारीपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. दरम्यान, या काळात उत्तरेत आणि दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून गाडीची चौकशी करून तिकीट काढावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Pune express way: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर गॅन्ट्री बसवण्यातही आज २ तासांचा मेगाब्लॉक; 'या' वेळेत वाहतूक बंद

पुण्यातून दक्षिण भारत आणि उत्तर जाणाऱ्या गाड्यांची संख्या मोठी आहे. सध्या आग्रा विभागातील पलवन-मथुरा जंक्शन येथे यार्ड रिमॉडलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पुढील काही दिवस चालणार आहे. यामुळे या काळात पुण्याहून सुटणाऱ्या तब्बल १६ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या ६ फेब्रुवारी पर्यंत रद्द राहणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हंजणे पुण्यातील उत्तरेत जाणारी जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस ही गाडी रद्द राहणार असल्याने, प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक तपासून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या गाड्या करण्यात आल्या रद्द

पुण्यातून सुटणारी पुणे जम्मू तावी झेलम एक्स्प्रेस ही गाडी १० जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान, रद्द करण्यात आली आहे, तर जम्मूतावी पुणे झेलम एक्स्प्रेस ही १२ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान, रद्द करण्यात आली आहे.

Pune traffic update : साधुवासवानी पूल पाडण्यासाठी कोरेगांव पार्क, बंडगार्डन परीरात वाहतुकीत मोठा बदल; अशी असेल व्यवस्था

कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस १६ ते ३० जानेवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. हजरत निजामुद्दी एक्स्प्रेस ते कोल्हापूर ११ जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर पुणे हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ही गाडी १२, १६, १९, २३, २६, ३० जानेवारी ते २, ६ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.

Mumbai Trans Harbour Link : भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर, दुचाकी, रिक्षांना बंदी; 'या' वेगाने करावा लागणार प्रवास

हजरत निजामुद्दीन पुणे एक्स्प्रेस ही ११, १५, १८, २२, २५, २९ जानेवारी १, ५ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. मिरज हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस १४, २१, २८ जानेवारी, ४ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. हजरत निजामुद्दीन मिरज एक्स्प्रेस १२,१९,२६ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.

यशवंतपूर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस २३, २५, ३० जानेवारी एक फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आली आहे. हजरत निजामुद्दीन यशवंतपूर एक्स्प्रेस २६,३१ जानेवारी, २, ७ फेब्रुवारीला रद्द राहील. वास्को द गामा निजामुद्दीन एक्स्प्रेस २० जानेवारी ३ फेब्रुवारी रद्द राहील. तर निजामुद्दीन वास्को द गामा एक्स्प्रेस २२ जानेवारी, ५ फेब्रुवारी रद्द राहील. म्हैसूर हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस १२,१९ जानेवारी, २ फेब्रुवारी रोजी रद्द राहील. हजरत निजामुद्दीन म्हैसूर एक्स्प्रेस १५, २२ जानेवारी, ५ फेब्रुवारी रद्द राहील. यशवंतपूर चंदीग्रह एक्स्प्रेस २०, २४, २७, ३१ जानेवारी, ३ फेब्रुवारी रद्द राहील. तर चंदीग्रह यशवंतपूर एक्स्प्रेस २३, २७, ३० जानेवारी व ३, ६ फेब्रुवारी रोजी रद्द राहील.

WhatsApp channel