Ganesh Chaturthi 2024: ओडिशातील बारीपाडा येथील एका युवा संघटनेने १८व्या वर्षी २५ हजार काचेच्या बांगड्या वापरून १५ फूट उंचीची गणेशमूर्तीची स्थापना केली. तसेच या गणेशमूर्तीसाठी बांबूचा मंडप तयार करण्यात आला आहे. काचेच्या बांगड्यांचा वापर करून तयार करण्यात आलेली गणेशमूर्ती सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे.
२५००० काचेच्या बांगड्यांनी बनवण्यात आलेली अतिशय अनोखी १५ फुटांची गणेशमूर्ती पाहण्यासाठी ओडिशासह देशभरातून लोक गर्दी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाच दिवसांसाठी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली असली तरी हा गणेशोत्सव ८ दिवस चालतो. या कालावधीत आदिवासी पारंपरिक गाणी, नृत्ये, राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धा अशा अनेक कार्यक्रम ठेवले जातात, अशी माहिती फ्रेंड्स युनियन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सौम्या रंजन मिश्रा यांनी एएनआयला दिली.
संबंधित गणेश मंडळचे हे १८ वे वर्ष आहे. ही अनोखी गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आणि सजावटीसाठी २२ ते २५ लाखांहून अधिक खर्च करण्यात आला आहे,असे संस्थेचे खजीनदार श्रीकांत बारिक म्हणाले. फ्रेंड्स युनियनचे सदस्य देबाशीष लाल म्हणाले की, ‘ या गणेशोत्सवात मुस्लिम समाजातील लोकांसह सर्व समुदायाच्या लोक गणेशाची पूजा करण्यासाठी येतात. हे आमची संघटना एकता आणि सांप्रदायिक सलोख्याचे प्रतीक आहे.’
देशभरात गणेश चतुर्थी उत्सवाला शनिवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, सुरत आणि दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमधील भाविक भक्तिभावाने आणि आनंदाने हा शुभ सोहळा साजरा करत आहेत. गणेश चतुर्थीला ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू झाली. हा उत्सव येत्या १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात गणेशमूर्तींची स्थापना करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. प्रत्येक शहरात लोकांनी आपापल्या घरांमध्ये आणि मंडपात गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. भव्य मिरवणुकांपासून ते पारंपारिक विधींपर्यंत, देशभरात उत्सव जोरात सुरू झाले आणि संपूर्ण भारतात या आनंदोत्सवाला सुरुवात झाली.
१) वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
२) एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननम्ं।
विघ्नशकरं देवं हेरम्बं प्रणमाम्यहम्॥
३) गजराजमुखाय ते नमो मृगराजोत्तमवाहनाय ते ।
द्विजराजकलाभृते नमो गणराजाय सदा नमोऽस्तु ते ॥
४) गजाननाय पूर्णाय साङ्ख्यरूपमयाय ते ।
विदेहेन च सर्वत्र संस्थिताय नमो नमः ॥
५) अमेयाय च हेरम्ब परशुधारकाय ते ।
मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः ॥