Myanmar soldiers : लढण्याऐवजी म्यानमारमधून पळून आले १५१ सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Myanmar soldiers : लढण्याऐवजी म्यानमारमधून पळून आले १५१ सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात

Myanmar soldiers : लढण्याऐवजी म्यानमारमधून पळून आले १५१ सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात

Updated Dec 31, 2023 12:44 PM IST

Myanmar soldiers fled in India : म्यानमारच्या पीपल्स डिफेन्स फोर्सने (पीडीएफ) भादो सेर येथील लष्करी छावण्या ताब्यात घेतल्यानंतर नोव्हेंबरमध्ये म्यानमारच्या लष्कराचे तब्बल १५१ सैनिक मिजोरम येथे पळून आले.

Myanmar soldiers fled in India
Myanmar soldiers fled in India (AFP)

Myanmar soldiers fled in India : भारताचा शेजारी असलेल्या म्यानमारमधील सैनिक शिबिरांवर एका वांशिक गटाने हल्ला केलावर म्यानमारचे तब्बल १५१ सैनिक मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यात पळून आले. म्यानमारच्या लष्करातील सैनिकांना 'तत्मादव' म्हणूनही ओळखले जाते. या सैनिकांनी शस्त्रे घेऊन पळ काढला आणि भारतात आश्रय घेतला. शुक्रवारी लाँगतलाई जिल्ह्यातील तुइसांतलांग येथे आसाम रायफल्सने त्यांना ताब्यात घेतले.

Thane rave party : ठाण्यात पोलिसांनी उधळली रेव्ह पार्टी! अमली पदार्थही जप्त; १०० जणांना घेतले ताब्यात

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून भारतीय सीमेजवळील भागात म्यानमार आर्मी आणि अरकान बंडखोरांच्या सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमकी होत आहेत. शुक्रवारी मिझोराममध्ये घुसलेले म्यानमार लष्कराचे काही सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आसाम रायफल्सने प्राथमिक उपचार केले आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, म्यानमारचे सैनिक आता म्यानमार सीमेजवळील लोंटलाई जिल्ह्यातील परवा येथे आसाम रायफल्सच्या सुरक्षित कोठडीत ठेवण्यात आले आहे.

अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्समध्ये भारतीय वंशाच्या कुटुंबाचा संशयास्पद मृत्यू; कर्ज फेडण्यासाठी विकला होता आलीशान बंगला

म्यानमारच्या सैनिकांना काही दिवसांत त्यांच्या मायदेशात परत पाठवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारचे लष्करी सरकार यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला, पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) ने म्यानमार-भारत सीमेवरील म्यानमार लष्करी छावण्यावर हल्ले करत त्या ताब्यात घेतल्या. यानंतर एकूण १५१ म्यानमार सैनिक मिझोराम येथे भारतीय हद्दीत पळून आले. भारतीय हवाई दलाने त्यांना मणिपूरमधील मोरेह येथे विमानाने नेले. यानंतर, त्यांना आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून म्यानमारच्या जवळच्या सीमावर्ती शहर तामू येथे पाठवण्यात आले.

पोलिसांच्या प्राथमिक तपासाच्या आधारे, पारावाजवळील म्यानमार लष्करी तळावर गुरुवारी म्यानमार पीपल्स आर्मी आणि चिन नॅशनल आर्मी (सीएनए)ने हल्ला करत या छावण्या ताब्यात घेतल्या होत्या. म्यानमारच्या लष्करी सैनिकांनी त्यांच्या छावणीतून पळ काढला, दोन आणि चार खांबावरील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून टुयसेंटलॉंग गावात ते पोहोचले, या ठिकाणी आणखी काही तात्माडॉ सदस्य भारताच्या सीमावर्ति गावात पोहोचले.

२०२२ पासून, मिझोरामला लागून असलेल्या म्यानमारच्या चिन राज्यातील तात्माडॉ कॅम्प स्थानिक प्रतिकार मिलिशिया आणि सीएनएच्या संयुक्त सैन्याने ताब्यात घेतले होते. निर्वासित असलेल्या म्यानमारच्या राष्ट्रीय एकता सरकारने बळाचा वापर करून १ फेब्रुवारी २०२१ रोजी उठाव करणाऱ्या लष्करी ग्रुपचे बंड मोडून काढण्याचे ठरवले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर