Viral News: डीजेसमोर नाचताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात खळबळ! नेमकं काय घडलं? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: डीजेसमोर नाचताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात खळबळ! नेमकं काय घडलं? वाचा

Viral News: डीजेसमोर नाचताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात खळबळ! नेमकं काय घडलं? वाचा

Updated Oct 18, 2024 09:13 AM IST

13-year-old boy dies during DJ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे डीजेसमोर नाचताना एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

डीजेसमोर नाचताना १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
डीजेसमोर नाचताना १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

13-year-old boy dies while dancing to loud DJ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली. डीजेसमोर नाचताना एका १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. समर बिलोरे असे या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या घरासमोरून दुर्गामूर्ती घेऊन जात असताना त्याने डीजेसमोर नाचायला सुरुवात केली. परंतु, तो अचानक जमीनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी आणि मोठा आवाज असल्याने लोकांचे समरकडे लक्ष गेले नाही. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मृताच्या आईने आपला मुलगा जमीनीवर पडल्याचे पाहून मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. मृत मुलाला हृदयाशी संबंधित आजार होता. परंतु, आता तो बरा होता, असेही त्याच्या आईने सांगितले.

या घटनेबाबत सांगताना समरच्या वडील म्हणाले की, डीजेचा आवाज खूप मोठा होता. अनेकदा बोलूनही डीजे थांबला नाही. याच दरम्यान माझ्या मुलाचा मृत्यू झाला. घटनेनंतर समरला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.

उत्तर प्रदेश: इंजेक्शन दिल्यानंतर मुलाचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या कोल्हुई येथील एका क्लिनिकमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच पोलिसांनी डॉक्टरवर कारवाईचे आश्वासन देऊन लोकांना शांत केले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला.

सोनौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंघुसरी येथे राहणारी चांदनी (वय, ७) तीन दिवसांपासून तापाने त्रस्त होती. गुरुवारी सायंकाळी चांदणीची आई संगीता उपचारासाठी एकसदवा येथील क्लिनिकमध्ये गेली. डॉक्टरांनी चांदनीला इंजेक्शन दिले. इंजेक्शन देताच चांदणीची तब्येत आणखी बिघडू लागली, असा आरोप नातेवाईकांकडून केला जात आहे. घरच्यांना काही समजेल तोपर्यंत चांदनी बेशुद्ध पडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. निरपराध व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समजताच घरात उपस्थित असलेल्या कुटुंबीयांचे धाबे दणाणले. कुटुंबीयांनी क्लिनिक गाठून डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरवर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी लोकांना शांत केले. पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात कलम १०५ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर