viral news : हैदराबादमधील १२५ वर्षीय महाकाय कासव चाणक्यचा मृत्यू : १० दिवसांपासून खाणे केले होते बंद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  viral news : हैदराबादमधील १२५ वर्षीय महाकाय कासव चाणक्यचा मृत्यू : १० दिवसांपासून खाणे केले होते बंद

viral news : हैदराबादमधील १२५ वर्षीय महाकाय कासव चाणक्यचा मृत्यू : १० दिवसांपासून खाणे केले होते बंद

Mar 19, 2024 06:32 AM IST

125 year old giant tortoise died : हैदराबाद येथील प्रसिद्ध अशा नेहरू प्राणी उद्यान येथील एका वृद्ध महाकाय कासवाचा मृत्यू झाला आहे.

हैदराबाद येथील प्रसिद्ध अशा नेहरू प्राणी उद्यान येथील एका वृद्ध महाकाय कासवाचा मृत्यू झाला आहे.
हैदराबाद येथील प्रसिद्ध अशा नेहरू प्राणी उद्यान येथील एका वृद्ध महाकाय कासवाचा मृत्यू झाला आहे.

पुणे : हैदराबाद येथील प्रसिद्ध अशा नेहरू प्राणी उद्यान येथील एका वृद्ध महाकाय कासवाचा मृत्यू झाला आहे. उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाणक्य असे या मृत कासवाचे नाव असून त्याने गेल्या १० दिवसांपासून खाणे बंद केले होते.

१२५ वर्षीय चाणक्य कासव हा प्राणिसंग्रहालयाच्या उद्घाटनापासून लोकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते. या कासावाचा मृत्यू वय-संबंधित गुंतागुंतमुळे झाला असल्याचे उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. चाणक्यने गेल्या १० दिवसांपासून खाणे बंद केले होते. त्यानंतर प्राणीसंग्रहालयाचे अधिकारी चिंतेत पडले होते.

Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?

प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनुसार, चाणक्यला रताळे आणि पालक खूप आवडत होते पण गेल्या काही दिवसांपासून त्याने काहीही खाल्ले नव्हते. शनिवारी सकाळी प्राणिसंग्रहालयाचे कर्मचारी त्याच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी गेले असता, हे कासव मृत्यू झाल्याचे त्यांना आढळले. या कसावाचा मृत्यू झोपेत झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Narendra Modi : अब की बार ४०० पार.. इतक्या जागा कशाला हव्यात?, पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

असा होता चाणक्यचा प्रवास :

नेहरू उद्यान हे हैदराबादमधील सर्वात जुने उद्यान असून ते हैदराबादच्या सातव्या निजामाने बांधले होते. चाणक्य कासव १९६३ साली नामपल्ली येथील सार्वजनिक उद्यानातून (बाग-ए-आम) आणण्यात आले होते. त्यानंतर हैदराबाद प्राणीसंग्रहालय त्यांचे घर बनले. प्राणिसंग्रहालयाच्या स्थापनेपूर्वी सार्वजनिक उद्यानांमध्ये प्राण्यांचे अधिवास असायचे.

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार मल्टीमल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे कासवाचा मृत्यू

चाणक्यच्या प्राथमिक शव विचेदन अहवालात कासवाचा मृत्यू मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे झाल्याचे समोर आले आहे. हे नमुने पुढील तपासणीसाठी पशुवैद्यकीय जैविक व संशोधन संस्था आणि राजेंद्रनगर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत. गॅलापागोस महाकाय कासव ही कासवांची सर्वात मोठी प्रजाती आहे. अशा प्रजाती चार्ल्स डार्विनच्या 'प्रजातींच्या उत्क्रांती' सिद्धांतासाठी त्यांच्या योगदानासाठी ओळखल्या जातात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर