मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ११६ जणांचा मृत्यू

Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ११६ जणांचा मृत्यू

Jul 02, 2024 05:33 PM IST

Uttar Pradesh Hathras Stampede: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मंगळवारी एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी (PTI)

Stampede at Religious Event in Uttar Pradesh Hathras:  उत्तरप्रदेशमधील  हाथरस येथे भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात मोठी दुर्घटना झाली आहे.  सत्संग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या ११६ वर पोहोचली आहे. चेंगराचेंगरी झाल्यानंतर खाली पडलेल्या लोकांनी तुडवत लोक सैरावैरा धावू लागले. मृतांमध्ये अधिकांश महिला आहेत. 

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मंगळवारी (०२ जुलै २०२४) एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे संगितले जात आहे. हाथरस जिल्ह्यातील सिकंदरा राऊ भागातील रती भानपूर गावात एक धार्मिक प्रचारक आपल्या अनुयायांना संबोधित करत असताना ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'धर्मप्रचारक भोळेबाबांचा धार्मिक कार्यक्रम होता. या धार्मिक कार्यक्रमाला स्थानिक लोकांनी प्रचंड गर्दी केली. त्यानंतर गुदमरु लागल्याने सहभागी झालेल्या लोकांमध्ये अस्वस्थता पसरली. यानंतर लोकांनी इकडे तिकडे धावायला सुरुवात केल्याने चेंगराचेंगरी झाली. या कार्यक्रमादरम्यान अत्यंत उष्ण आणि दमट वातावरण होते, अशी माहिती अलिगड परिक्षेत्राचे महानिरीक्षक शलभ माथुर यांनी दिली.

ट्रेंडिंग न्यूज

गंगा देवी (वय ७०, रा. हाथरस), प्रियांका (वय २०, रा. कासगंज), जसोदा (वय ७०, मथुरा) आणि सरोज लता (वय ६०, रा. एटा) अशी या घटनेत मरण पावलेल्या महिलांची नावे आहेत. तर, काव्या (वय, ४) आणि आयुष (वय, ८) अशी मृत मुलांची नावे असून दोघेही शहाजहानपूरचे रहिवासी आहेत. घटनेचे नेमके कारण तपासले जात आहे.

बचावलेल्यापैकी एकाने दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. कार्यक्रम संपताच सगळेजण बाहेर पडण्यासाठी धावू लागल्याने ही घटना घडली. “घटनास्थळी अनुयायांची मोठी गर्दी जमली होती. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता आणि सर्वजण एकमेकांवर पडले आणि चेंगराचेंगरी झाली. मी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाहेर मोटारसायकली उभ्या होत्या, ज्यामुळे माझा मार्ग बंद झाला. अनेकजण बेशुद्ध झाले, तर काहींचा मृत्यू झाला”, अशी माहिती जवळच्या रुग्णालयात दाखल असलेल्या एका पीडितेने दिली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शोकाकूळ

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून हाथरस जिल्ह्यातील आणि आसपासच्या अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर