Girl Dies Consuming Cake: ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानं १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू!-10yrold dies of food poisoning in punjab patiala after consuming cake ordered online ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Girl Dies Consuming Cake: ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानं १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू!

Girl Dies Consuming Cake: ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्यानं १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू!

Mar 30, 2024 09:12 PM IST

Girl Dies Of Food Poisoning in Punjab: पंजाबच्या पटियाला येथे ऑनलाईन ऑर्ड केलेल्या केक खाल्लाने १० वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला.

वाढदिवसाचा केक खाल्ल्याने एका १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.
वाढदिवसाचा केक खाल्ल्याने एका १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. (Freepik)

10 year Old Girl Dies After Eating Birthday Cake: पंजाबमधील पटियाला येथून धक्कादायक माहिती समोर आली. ऑनलाइन ऑर्डर केलेला वाढदिवसाचा केक खाल्ल्याने १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार, पटियाला येथील एका कुटुंबाने २४ मार्च रोजी एका बेकरीतून केक ऑर्डर केला होता. मात्र, हा केक खाल्यानंतर कुटुंबातील प्रत्येकाला मळमळ आणि उलट्या यांसारसा त्रास होऊ लागला. एकाच वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रकृती संशयास्पदरित्या बिघडल्याने शेजाऱ्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारपूर्वीच डॉक्टरांनी १० वर्षाच्या मुलीला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बेकरी दुकान मालकाविरोधात आयपीसीच्या कलम २७३ आणि ३० (४) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. बेकरीचे नाव आणि बेकरी कोणत्या ठिकाणी आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, आपल्या मुलीच्या मृत्युला केक कारणीभूत असल्याचा दावा करत कुटुंबातील सदस्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

केरळ: शवरमा खाल्ल्याने २४ व्यक्तीचा मृत्यू

यापूर्वी ऑक्टोबर २०२३ मध्ये केरळमध्ये शवरमा खाल्ल्यानंतर एका २४ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. संबंधित व्यक्तीने एका रेस्टॉरंटमधून शवरमा ऑर्डर केला होता, जो अधिकाऱ्यांनी बंद केला.राहुल नायर असे मृत व्यक्तीने नाव असून तो कोट्टायम येथील रहिवाशी होता. त्याने १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ले हयाथ रेस्टॉरंटमधून शावरमा ऑर्डर केले होते. मात्र, शवरमा खाल्ल्यानंतर तो आजारी पडला. त्यानंतर १९ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याला कक्कनड येथील सनरायझ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार घेतल्यानतंर त्याच दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आले. परंतु, अशक्तपणामुळे त्याला २२ ऑक्टोबर २०२३ रोजी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. अन्नातून विषबाधा झाल्याने नायरचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले.

विभाग