Government Jobs 2024: उत्तर रेल्वेने क्रीडा कोट्याअंतर्गत गट डी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, उत्तर रेल्वे रिक्रूटमेंट ड्राइव्ह २०२४अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड क्रीडा चाचणीतील कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख यासह उत्तर रेल्वे भरती मोहिमेशी संबंधित इतर तपशील जाणून घेऊयात.
उत्तर रेल्वेने एकूण ३८ पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली. यासाठी विविध खेळांमधून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. प्रत्येक खेळाशी संबंधित रिक्त पदांची संख्या उत्तर रेल्वेने त्याच्या पात्रता निकषांमध्ये दिली आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. याशिवाय, त्यांच्याकडे संबंधित खेळाचे आवश्यक क्रीडा प्रमाणपत्र असावे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ०१ जुलै २०२४ रोजी १८- २५ वर्षे असावे. अधिसूचनेनुसार, या पदांसाठी वयात कोणतीही सूट दिली जाणार नाही. स्वारस्य असलेले आणि पात्र उमेदवार उत्तर रेल्वेमधील या गट डी पदांसाठी १६ मे २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी rrcnr.org वर ऑनलाइन भेट देऊन अर्ज करू शकतात. उत्तर रेल्वे भरती २०२४ साठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया १० जून २०२४ रोजी आयोजित केली जाईल. याबाबत उत्तर रेल्वेच्या rrcnr.org या संकेतस्थळावरून सविस्तर माहिती दिली जाईल.
- उत्तर रेल्वेची अधिकृत वेबसाइट https://www.rrcnr.org/ येथे भेट द्या
- वेबसाइटच्या होमपेजवर उत्तर रेल्वे रिक्रूटमेंट २०२४ पर्यायावर क्लिक करा.
- एक फॉर्म उघडेल, आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा.
- अर्ज भरल्यानंतर 'सबमिट' बटणावर क्लिक करा.
- यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
- सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ ठेवा.