मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली आहे. जिरीबाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि कुकी दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सुरक्षा दलांनी कुकीच्या ११ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान ही जखमी झाला आहे. या भागातील तणाव लक्षात घेता सुरक्षा दलांचा बंदोबस्त वाढवण्यायात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी यापूर्वी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंनी चकमक सुरू झाली. अचानक झालेल्या या हल्ल्यात एक तरुण ही जखमी झाला आहे. जवानाला विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सीआरपीएफच्या जवानांनी कुकीच्या ११ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यात सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शेतात काम करणारा शेतकरी जखमी झाला होता. मणिपूरमध्ये इम्फाळ खोऱ्यातील शेतकऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी डोंगराळ भागातून अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यांमुळे खोऱ्याच्या वेशीवर राहणारे अनेक शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून त्याचा परिणाम भात पिकाच्या काढणीवर होत आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात इंफाळ खोऱ्यातील डोंगराळ भागात मैतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमध्ये जातीय हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात आणि जाळपोळीत २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो लोक बेघर झाले होते.
बोरोबेकरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जाकुरढोर भागात झालेल्या चकमकीत सैनिकांच्या गणवेशात असलेले दहशतवादी ठार झाल्याची माहिती लोकांनी दिली. अतिरेक्यांनी या भागातील मेइतेई गावात बेवारस दुकानांना आग लावली आणि अनेक राऊंड गोळीबार केल्याचा आरोप आहे.
इंफाळ पूर्व आणि बिष्णुपूर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या हिंसाचारात एका शेतकऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत.
जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (जेएनआयएमएस) येथे उपचार घेत असलेल्या इंफाळ पूर्वेकडील न्यू कॅनन येथील शेतकरी कंशोक होराम (३५) यांनी सांगितले की, ते यान गांगपोक्पी शांती खोंगबल येथील भाताच्या शेतात गेले असता ते जखमी झाले. सकाळी नऊच्या सुमारास मला गोळीबाराचा आवाज ऐकू आला आणि जेव्हा मी स्वतःकडे पाहिलं तेव्हा मला अनेक जखमा दिसल्या. हल्लेखोरांनी थेट आमच्यावर गोळ्या झाडल्या. आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही... काही वेळाने बीएसएफचे जवान आणि यानगांगपोक्पी पोलिसांनी प्रत्युत्तर देत आमची सुटका केली.