पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उल्हासनगर: पूर्ववैमनस्यातून ३० वेळा वार करुन तरुणाची हत्या

तरुणाची निर्घृण हत्या

उल्हासनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोनमध्ये मध्यरात्री ही घटना घडली. दिपक भोईर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ८ ते १० जणांच्या टोळीने दिपक भोईरवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. उल्हासनगरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  

'नाईट लाईफ भारतीय संस्कृती नाही, यामुळे निर्भयासारख्या घटना वाढतील'

उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन परिसरात असलेल्या पटेल लो प्राइझ शॉपजवळ ही घटना घडली. उल्हासनगरमधील माणेरे गावात राहणाऱ्या दिपक भोईरची हत्या करण्यात आली. दिपकवर ८ ते १० हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. दिपकच्या तोंड, डोके, हात, पाय, पोट आणि छातीवर वार करण्यात आले. 

प्रियांका गांधींच्या सक्रीय राजकारणाचे एक वर्ष आणि सहा मुद्दे

दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दिपकला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. उल्हासनगर पोलिस आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

धक्कादायक! मुंबईत प्रवासी महिलेवर सामूहिक बलात्कार