पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बदलापूरमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणाची भरचौकात निर्घृण हत्या

पिंपरी बलात्कार आणि हत्या प्रकरण

बदलापूरमध्ये एका तरुणाची दिवसाढवळ्या चाकूने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बदलापूरच्या शिरगाव परिसरातील माऊली चौकात दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. सचिन शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो सांगली येथे राहणारा होता. आरोपी देव कोयंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करत बदलापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

मनसे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट

आरोपी देव कोयंडे यांच्या मुलीला सचिन शिंदे सतत त्रास देत होता. देव यांची मुलगी विधवा असून ती तिच्या लहान मुलाला शाळेत सोडायला जायची. त्यावेळी सचिन तिला रस्त्यामध्ये अडवून लग्न करण्याची मागणी करायचा. सचिन तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. मात्र देव यांच्या मुलीला हे मान्य नव्हते. याप्रकरणी बदलापूर पोलिस ठाण्यात सचिन विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. 

मायावतींनी HM अमित शहांचे चॅलेंज स्वीकारलं

दरम्यान, पोलिसांनी सचिनला समज सुध्दा दिला होता. मात्र तरी सुध्दा सांगलीवरुन येऊन सचिन तिला त्रास देत होता. सचिनच्या या वागण्यामुळे आरोपी देव कोयंडे संतप्त झाले होते. ते आज दुपारी नातवाला सोडण्यासाठी शाळेत आले असता सचिन रिक्षात बसला होता. संतप्त झालेल्या देव यांनी चाकूने वार करत सचिनची हत्या केली त्यानंतर ते स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाले आणि हत्या केल्याचे कबुली दिली. पोलिसांनी याप्रकरणी देव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करत पुढील तपास सुरु केला आहे. 

...तर मनसेविरोधात कोर्टात जाणार; विनोद पाटील यांचा इशारा