पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कळव्याजवळ धावत्या लोकलमधून तिघे पडले, एकाचा मृत्यू

मुंबई लोकल

लोकलमधील गर्दीमुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. कळवा-मुंब्रा स्थानका दरम्यान लोकलमधून तिघे जण पडले. यामधील एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमींवर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

राम जन्मभूमी ट्रस्टमधील एक विश्वस्त कायम दलित समाजातील - अमित शहा

सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकलमधून तिघे जण पडले. कळवा रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली. मुंब्रा ते कळवा स्थानका दरम्यान लोकलमधील गर्दीमुळे तिघे जण पडले. यामधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामधील एक जण कल्याणचा तर दुसरा अंबरनाथ येथे रहाणारा असल्याची माहिती समोर येत आहे. जखमी झालेल्या दोघांना ताबडतोब कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

मध्य रेल्वे मार्गावर लोकलमधील गर्दीमुळे अनेकांचा बळी गेला आहे. १८ जानेवारीला डोंबिवलीमध्ये धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी झाला होता. तर त्याच्या मागच्या महिन्यामध्ये लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, जीआरपीच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये रेल्वे मार्गावर एकूण २ हजार ६९१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३ हजार १९४ प्रवासी जखमी झाले. 

श्रीनगरमधील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद