पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लवकरच जखमी, अपघातग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी १५० मदतनीस, प.रे.चा निर्णय

पश्चिम रेल्वे प्रातिनिधिक छायाचित्र

लोकल ही मुंबईची लाईफ लाइन समजली जाते. सर्वाधिक प्रवासी प्रवासासाठी  लोकलचा वापर करतात. मात्र लोकलप्रवासात अपघात होऊन जखमी होणाऱ्या किंवा मृत्यू पावणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. ही बाब लक्षात घेता प्रवाशांच्या मदतीसाठी प्रत्येक स्टेशनवर किमान चार मदतनीस तैनात करण्याचा  महत्त्वपूर्ण निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. येणाऱ्या काळात चर्चगेट ते डहाणूदरम्यान जखमी आणि अपघातग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी १५० मदतनीस तैनात करण्यात येणार आहेत. 

कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी पाणी कपात

आतापर्यंत जखमी आणि अपघातग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी पश्चिम रेल्वे आरपीएफची मदत घेत होती. मात्र आता विशेष मदतनीस प्रवाशांच्या मदतीसाठी असणार आहेत. वैद्यकिय आपातकालीन परिस्थिती दरम्यान प्रवाशांना मदत पुरवणे हे प्रमुख काम त्यांचं असणार आहे. हे मदतनीस प्रवाशांना मदत करतील. अपघाताच्यावेळी अशा मदतनीसांची अपघातग्रस्तांना मोलाची मदत होईल. यामुळे पटकन  वैद्यकीय मदत उपलब्ध होईल, एखाद्या अपघातग्रस्ताचा जीवही वाचेल. अनेकदा प्रवास करताना गर्दीमुळे प्रवाशी ट्रेनमधून पडतात, रुळ ओलांडताना अपघात होतात अशावेळी हे मदतनीस चटकन प्रवाशांच्या मदतीला धावून येऊ शकतात असा विश्वास पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं व्यक्त केला आहे.

ठाकरे सरकारच्या पतनास सुरुवातः देवेंद्र फडणवीस 

प्रत्येक रेल्वे स्थानकावर चार मदतनीस तैनात करण्यात येतील. हे मदतनीस १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करतील. प्लॅटफॉर्म, स्टेशन मास्तरच्या कार्यालयात, फूटओव्हर ब्रीजवर हे मदतनीस प्रवाशांच्या मदतीसाठी उभे असतील.