पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात जुलमी राजवट उलथवण्याची ताकद- राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर तुटून पडत असलेल्या राज ठाकरेंनी जागतिक व्यंगचित्रकार दिनीही अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी व्यंगचित्रकारांना शुभेच्छा देत आज देशाला तुमची गरज असल्याचेही म्हटले आहे.

दुर्लक्ष करु नका, गाफील राहू नका, राज ठाकरेंची जनतेला विनंती

ते म्हणाले की, 'व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते. आज #जागतिकव्यंगचित्रकारदिन या निमित्ताने देशभरातील माझ्या व्यंगचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा तर आहेतच पण तुमच्या प्रतिभेची देशाला आज सगळ्यात जास्त गरज आहे हे मात्र विसरू नका.'

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक काळात राज्यात १० जाहीर सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. मोदींचे सत्तेवर येण्यापूर्वीचे आणि सत्तेवर आल्यानंतर केलेल्या वक्तव्याचे व्हिडिओ दाखवून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. भाजपने त्यांना प्रत्युत्तरही दिले होते. 

राज ठाकरे आणि शरद पवार यांची भाषा 'सेम टू सेम'

राज ठाकरे हे सभा घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करत असून सभांच्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाने मागावा अशी तक्रार भाजप नेत्यांनी केली होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने नोटीस पाठवण्याची हालचाल सुरु केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, राज ठाकरे यांच्या बचावार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उतरले आहेत. मनसेने लोकसभेसाठी उमेदवारच न दिल्याने निवडणूक आयोगाला त्यांना हिशोब मागण्याचा अधिकार नाही. एखाद्या पक्षाने कोणताही उमेदवार उभा न करता सभा घेतल्या तर तो त्याचा लोकशाही अधिकार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.