पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकलमधल्या भांडणात फाडला विद्यार्थींनीचा शर्ट, विनयभंगाच्या आरोपाखाली महिलेला अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

लोकलमधल्या भांडणात ३८ वर्षीय मत्सविक्रेत्या महिलेनं २० वर्षीय विद्यार्थींनीचा शर्ट रेल्वे स्थानकावर  फाडला. विद्यार्थींनीच्या तक्रारीनंतर कांदिवली रेल्वे पोलिसांनी  या महिलेस विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. 

कोअर कमिटीच्या बैठकीला पंकजा मुंडेंच्या अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मालाड येथील रहिवासी असलेली ही विद्यार्थींनी सकाळी आठच्या सुमारास कॉलेजला जात होती.  कांदिवली स्थानकात ट्रेन आली असताना विद्यार्थीनीनं  चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला  त्याचवेळी आरोपी महिला ज्योती शर्मा ही देखील चालत्या ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात होती. तिनं पुढे उभ्या असलेल्या विद्यार्थींनीला धक्का मारला. स्थानकात उतरल्यानंतर या दोघांमध्ये याच कारणावरून वाद सुरू झाला. या भांडणानंतर आरोपी महिला ज्योती शर्मा हिनं विद्यार्थींचा शर्ट खेचला. त्यामुळे शर्टची बटणं तुटून शर्ट फाटला गेला त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वाईट प्रसंगला सामोरं जावं लागल्याची तक्रार या विद्यार्थीनीनं केली आहे.

अमेरिकेतील न्यू जर्सीत गोळीबार; पोलिस अधिकाऱ्यासह ६ जण ठार

कपडे फाडल्यानंतर ही विद्यार्थीनी मदतीसाठी आरडा ओरडा करत होती, या महिलेनं तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र गस्तीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या महिलेला स्थानकाबाहेर पकडलं. तिच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.