पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रेमप्रकरण अमान्य, आईनं केली मुलीची गळा आवळून हत्या

प्रातिनिधिक छायाचित्र

मुलीचे प्रेमप्रकरण अमान्य असलेल्या  आईनं मुलीची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मशीद बंदर येथे घडला आहे. मुलीची हत्या केल्याची कबूली आईनं पोलिस स्थानकात जाऊन दिली. 

चुकून सीमा ओलांडून गेलेल्या भारतीयांवरून पाकचे 'नापाक' राजकारण

मशीद बंदर येथील संत तुकाराम मार्गावरील झोपडपट्टीत हा गुन्हा घडला. ४० वर्षीय पापू वाघेला नावाच्या महिलेनं २३ वर्षांच्या मुलीची ओढणीनं गळा आवळून हत्या केली. प्रियकरासोबत पळून जाण्याच्या बेतात असताना आईनं रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद आणखी वाढत गेल्यानं आईनं टोकाची भूमिका घेत मुलीचं आयुष्य संपवलं. 

शेतकऱ्यांवर इतके प्रेम होते तर सरकार का नाही बनवले? - नवनीत कौर

मृत तरुणीचं नाव निर्मला असून गेल्या काही महिन्यांपासून तिचे शेजारी राहणाऱ्या तरुणाशी प्रेमसंबध होते. या प्रेमप्रकरणाला निर्मलाच्या कुटुंबीयांचा विरोध होता. या कारणावरून निर्मला आणि तिच्या आईचे वारंवार खटके उडत. रविवारी प्रियकरासोबत पळून जाण्याच्या बेतात असताना आईनं तिला रोखलं. दोघांचे वाद झाले. या वादातून आईनं मुलीची हत्या केली. या प्रकरणात निर्मलाच्या भावालाही पोलिसांनी अटक केली.