पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनांत तरुणीवर तिघांचा बलात्कार

बलात्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबईमध्ये काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर तिघांनी बलात्कार केला. १९ फेब्रुवारीला रात्री ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी एका रिक्षाचालकासह तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

दिल्ली हिंसाचार : पश्चिमी उत्तर प्रदेशातून आणल्या गेल्या गावठी पिस्तूल

या संदर्भात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ फेब्रुवारीला पीडित तरुणी आपल्या नातेवाईकांसोबत घाटकोपर स्थानकावर आली होती. त्यावेळी नातेवाईकांसोबत ती लोकल गाडी पकडू शकली नाही. त्यानंतर तिने दुसरी लोकल पकडली आणि मुंब्र्याला उतरली. त्या रात्री ती मुंब्रा स्थानकावरच झोपली. १९ फेब्रुवारीला तिने दुसरी लोकल पकडली आणि ती दिवा स्थानकावर पोहोचली. स्वतःकडे काहीच पैसे नसल्याने तिला आपली नथ विकायची होती. त्यासाठी तिने दिवा स्थानकावरील एका महिला भिकारीची मदत घेतली. पीडित तरुणी दिवसभरात आपली नथ विकू शकली नाही. त्यानंतर ती पुन्हा दिवा स्थानकात जाण्यासाठी रस्त्यावर चालत होती. 

पीडित तरुणीने १९ फेब्रुवारीला रात्री एका रिक्षाचालकाला दिवा स्थानकात पोहोचविण्याची विनंती केली. त्याच रिक्षाचालकाने तिला एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर रिक्षाचालकाने तिला एका मंदिराजवळ सोडले. पीडित तरुणीने एका स्कूटरस्वाराकडे मदतीची याचना केली. या स्कूटरवरून दोघे जण प्रवास करीत होते. या दोन्ही स्कूटरस्वारांनी तिला आपल्या गाडीवर घेतले. या दोघांनी तिला घणसोळीतील दुर्गम ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

प्रशांत किशोर यांच्याविरोधात कल्पना चोरल्याचा आरोप, फसवणुकीचा गुन्हा

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे आणि आरोपींच्या वर्णनाआधारे पोलिसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने या तिघांना २९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.