पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑनलाइन मास्क मागवणाऱ्या मुंबईतील महिलेला ४ लाखांचा गंडा

प्रातिनिधिक छायाचित्र

ऑनलाइन मास्क मागवणाऱ्या २८ वर्षीय महिलेला ४ लाखांचा गंडा घालणाऱ्या दक्षिण मुंबईतील २३ वर्षीय इंजिनिअरला वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनामुळे मास्कला मोठी मागणी आहे, मास्कचा व्यवसाय करण्याच्या उद्देशानं या महिलेनं १ लाख ६० हजार मास्कची ऑनलाइन ऑर्डर अबरर मुस्ताक बोडले या तरुणाला दिली होती. 

कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताकडे एकमेव जालीम उपाय - तज्ज्ञ

 कोरोनाच्या भीतीमुळे ओमान आणि फ्रान्समध्ये मास्कला मोठी मागणी आहे म्हणून नम्रता मनोच्या या वडाळ्यात राहणाऱ्या महिलेनं अबररला ऑर्डर दिली होती, स्वस्तात मास्क उपलब्ध करुन देतो असं त्यानं सांगितलं होतं. नम्रता ही आखाती देशांना वस्तू पुरवणाऱ्या एका कंपनीची संचालक आहे. तिनं १ लाख ६० हजार  मास्क अबररकडून मागवले होते. यासाठी तिनं आगाऊ ४ लाखांची रक्कम अबररला दिली होती. या मास्कची एकूण  किंमत १४ लाख ४० हजारांहून अधिक होती. ऑर्डर देताना तिनं अबररकडून जीएसटी आणि आयएसओ प्रमाणपत्र आणि व्यवाहारासाठी लागणारे इतर दस्ताऐवज मागवले होती, मात्र नंतर ही प्रमाणपत्रे आणि दस्ताऐवज खोटी असल्याचं समोर आलं. 

निर्भया प्रकरणातील दोषींच्या आई-वडील आणि मुलांची दयामरणाची मागणी

कोरोनामुळे सॅनिटायझर आणि मास्कची मागणी वाढली आहे. या वस्तू बाजारात जवळजवळ उपलब्धच नाही किंवा त्याच्या किमती या दुपटीहूनही अधिक आहे. याचा गैरफायदा घेत अनेक लोक लुबाडत आहे किंवा ग्राहकांना फसवत आहेत त्यामुळे ग्राहकांनी दक्षता घ्या, अस आवाहन नम्रता यांनी केलं आहे. दरम्यान ग्राहकांची फसवणूक करुन पैसे लुबाडल्याप्रकरणी वडाळा पोलिसांनी अबरर अटक केली आहे. 

बहुमत सिद्ध करू, कमलनाथ यांचा विश्वास