पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माहिम : वडिलांनी केला विनयभंग, १६ वर्षांच्या प्रियकरासोबत रचला हत्येचा कट

(HT Photo )

काही दिवसांपूर्वी मुंबईतील माहिम समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये मानवी शरीराचे अवयव सापडल्याने खळबळ उडाली होती. या हत्येचं गुढ पोलिसांना उकललं आहे, मंगळवारी मानवी शरीराचे अवयव असलेली दुसरी बॅगही मिठी नदीत पोलिसांना सापडली आहे.   मृत व्यक्तीचे नाव बॅनोटो असून त्यांच्या १९ वर्षीय दत्तक मुलीनं  विनयभंगाला कंटाळून वडिलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. १६ वर्षांच्या प्रियकराला सोबत घेऊन हत्येचा कट रचल्याची कबुलीही मुलीनं पोलिसांना दिली आहे. 

लोकलमधल्या भांडणात फाडला विद्यार्थींनीचा शर्ट

नेमकं काय घडलं
बॅनोटो रिबेलो यांनी २०१७ मध्ये मुलीला दत्तक घेतलं होतं. वडिलांकडून सतत विनयभंग व्हायचा असं, आरोपी मुलीनं पोलिसांच्या चौकशीत सांगितलं. बॅनोटो  आणि त्यांच्या मुलीमध्ये २६ नोव्हेंबरला वाद झाला. त्यानंतर तिनं बांबूनं त्यांच्या डोक्यात जोरदार आघात केला. यावेळी मुलीचा १६ वर्षांचा प्रियकरही तिथे उपस्थित होता. त्यानंतर मच्छर मारण्याचा स्प्रे वडिलांच्या तोंडावर मारून त्यांचा मृत्यू झाला असल्याची दोघांनी खातरजमा करून घेतली.

VIDEO: मुंबईतील डोंगरी मार्केटमधून कांदा चोरी; दोघांना अटक

या दोघांनीही सुरे आणि हातोडीच्या साहाय्यानं बॅनोटो यांच्या शरीराचे तुकडे केले. ते चार वेगवेगळ्या बॅगेत भरून त्यांनी ते २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मिठी नदीत सोडून दिले. पोलिसांना यापैकी दोन बॅग सापडल्या असून स्थानिकांच्या मदतीने ते उर्वरित दोन बॅगांचा शोध घेत आहेत.