पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रौढांसाठीचे व्हिडिओ बघण्याची बळजबरी केल्याने गणेश आचार्य अडचणीत, महिलेची तक्रार

गणेश आचार्य

बॉलिवूडमधला नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य पुन्हा वादात सापडला आहे. ३३ वर्षीय महिलेनं गणेश आचर्यवर गंभीर आरोप केले आहेत.  यात प्रौढांसाठीचे व्हिडिओ बघण्याची  बळजबरी केल्याचा तसेच कामापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. गणेश आचार्यविरोधात अंबोली पोलिस ठाणे तसेच महिला आयोगाकडे या महिलेनं तक्रार केल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे. 

मारुतीच्या गाड्या महागल्या, नवे दर अमलात

गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांनी देखील गणेश आचार्यवर गंभीर आरोप केले होते. त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या डान्सरची  गणेश आचर्य पिळवणूक करतो तसेच पदाचा वापर करून सिने डान्सर्स संघटनेची प्रतिमाही मलीन करण्याचा प्रयत्न आचर्यनं केला असा आरोप सरोज खान यांचा होता. 

हे प्रकरण ताजं असताना एका महिला डान्सरनं गणेश आचार्यविरोधात तक्रार केली आहे.  यात  तिला कामापासून गणेश आचार्यनं वंचित ठेवल्याचा प्रमुख आरोप आहे. तसेच कामासाठी अतिरिक्त कमिशन मागणे आणि  प्रौढांसाठीचे व्हिडिओ बघण्याची  बळजबरी केल्याचा आरोप  आहेत. या आरोपांवर गणेश आचर्य यांची प्रतिक्रिया  अद्याप आलेली नाही.

विवाहबाह्य संबंधातून महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या