पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामायण एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी भजनं आणि विविध प्रसंगांचे पेंटिंग्ज

प्रातिनिधिक छायाचित्र

देशातील प्रभू श्रीरामाच्या विविध श्रद्धास्थानांना जोडणाऱ्या रामायण एक्स्प्रेसची वैशिष्ट्ये एकदम हटके असणार आहेत. या खास गाडीमध्ये अतंर्गत भागातील सजावटही रामायणावर आधारित असेल. त्याचबरोबर गाडीमधील स्पीकरवरून प्रवाशांना विविध भजनं ऐकवली जातील. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. 

राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप, काँग्रेसचा फायदा आणि तोटाही

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही के यादव म्हणाले, १० मार्चला या रेल्वेचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची सेवा सुरू होईल. येत्या आठवड्याभरात त्याचे पुढील वर्षभराचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. प्रभू श्रीरामाच्या विविध ठिकाणी या रेल्वेच्या माध्यमातून दर्शनासाठी जाता येईल. 

चीनमध्ये कोरोनामुळे १५२३ मृत्युमुखी, ५,१३,१८३ बाधितांच्या संपर्कात

ही रेल्वे देशाच्या विविध भागातून सुरू होईल. म्हणजे तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्याचा वापर करता येईल. या गाडीच्या बाहेरील बाजूस आणि आतील बाजूस रामायणमधील विविध प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. गाडीमध्ये बसल्यावर प्रवाशांना विविध भजनं ऐकायला मिळतील. या गाडीतील प्रवासासाठी प्रवाशांकडून किती भाडे घ्यायचा याचे नियोजन सध्या केले जात आहे. होळीनंतर ही रेल्वे धावण्यास सुरुवात होईल, असे यादव यांनी स्पष्ट केले.