पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

३५० खासदारांचे बहुमत हा राम मंदिराचाच जनादेश - शिवसेना

उद्धव ठाकरे

लोकसभेत ३५० खासदारांचे बहुमत हा राम मंदिराचाच जनादेश असल्याचे सांगत केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील NDA महत्त्वाचा घटक पक्ष शिवसेनेने मंगळवारी राम मंदिराच्या दिशेने आता केंद्र सरकारने एक पाऊल टाकले पाहिजे, अशी मागणी केली. अयोध्येतील श्रीरामामुळेच लोकसभेत एनडीएचे ३५० खासदार निवडून आले. प्रभू श्रीरामामुळेच एनडीएला सत्ता मिळाली, आता श्रीरामाचा वनवास संपवून त्यांना हक्काचे छप्पर देऊ शकत नाही का, असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखातून मंगळवारी अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नाला हात घालण्यात आला आहे. त्याचबरोबर राम मंदिराच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने स्वतःहून पाऊल टाकले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना राम मंदिराचा मुद्दा आग्रहीपणे लावून धरते आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला होता. त्यानंतर गेल्या रविवारीही उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नवनिर्वाचित १८ खासदारांसह अयोध्येचा दौरा केला. 

केंद्र सरकार संजय दत्तकडे मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत

शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे की, 'श्रीरामाच्या कृपेनेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही, तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे. ज्यांनी राममंदिरास विरोध केला ते नष्ट झाले. रामाच्या नावाने समुद्रात दगडही तरले. रामसेतू उभा राहिला. त्याच रामाच्या नावाने आजचे दिल्लीतील सरकारही तरले. प. बंगालात जाऊन अमित शहा यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला आणि प्रभू श्रीरामाने कमाल केली. ममता बॅनर्जी यांना दुर्बुद्धी झाली. श्रीरामाचे नारे देणाऱ्यांना त्यांच्या सरकारने अपराधी ठरवले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ममता बॅनर्जींनी श्रीरामास विरोध केला म्हणून प. बंगालच्या हिंदुत्ववादी जनतेने भाजपचे १८ खासदार निवडून दिले.'

जेटचे पुन्हा उड्डाणाचे स्वप्न भंगले, दिवाळखोरीच्या कारवाईला सुरुवात

'उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती हे ‘बाबरी भक्त’ एक झाले. राममंदिरास या दोघांचा विरोध. त्यामुळे ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या ६१ खासदारांना विजयी करून भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले. हे प्रभू श्रीरामाचे भांडार आहे. ते भाजप-शिवसेनेला प्रसाद म्हणून मिळाले. आता वनवासातल्या रामास मुक्त करण्याची जबाबदारी कोणाची? ती शतप्रतिशत भाजप आणि शिवसेनेचीच आहे.' असेही या अग्रलेखात म्हटले आहे.