पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरे विधान परिषद पोटनिवडणुकीत उतरणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जानेवारी महिन्याच्या अखेरिस होत असलेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतरणार का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यामुळे त्यांना सहा महिन्यांच्या आत महाराष्ट्र विधीमंडळाच्या एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. आता ते थेट लोकांमधून निवडून विधानसभेत जाणार की विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत उतरणार हे पाहावे लागेल.

'आपल्या राज्यघटनेचा मसुदा ब्राह्मण व्यक्तीनेच लिहिला होता'

येत्या २४ आणि ३१ जानेवारी रोजी विधान परिषदेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होते. विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आता विधानसभेत निवडून आले आहेत. नव्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत. तर शिवसेनेचे तानाजी सावंत हे सुद्धा विधानसभेत निवडून आले आहेत. हे दोघेही विधान परिषदेचे सदस्य होते. विधानसभेत निवडून आल्यावर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही रिक्त जागांसाठी २४ आणि ३१ जानेवारी रोजी निवडणूक होते आहे.

तानाजी सावंत हे यवतमाळ स्थानिक स्वराज संस्थेमधून शिवसेनेकडूनच विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यामुळे या ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उद्धव ठाकरे उतरणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत एका सभागृहाचा सदस्य होणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांना विधानसभेचे सदस्य व्हायचे असेल तर शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी एकाला राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे उमेदवारी घेऊ शकतात.

इराकमधील इराण समर्थक सैनिकांवर हवाई हल्ला, ६ ठार

धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेसाठी २४ जानेवारीला मतदान घेण्यात येणार असून, त्याच दिवशी मतमोजणी होईल. तर तानाजी सावंत यांच्या रिक्त जागेसाठी ३१ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून, ४ फेब्रुवारीला त्याची मतमोजणी होणार आहे. 

उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत निवडून गेले तर त्यांना या सभागृहाचे नेतेपदही मिळेल. या स्थितीत विधानसभेमध्ये शिवसेनेला त्या सभागृहात निवडून आलेल्या नेत्याला सभागृह नेतेपद द्यावे लागेल.