पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुन्हा भाजप सरकार आणल्याशिवाय दिल्लीवारी नाहीः फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकार विश्वासघातकी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रात पुन्हा भाजप सरकार आणल्याशिवाय दिल्लीवारी करणार नसल्याचे स्पष्ट करत केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्याच्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. वांद्रे येथे विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

CAA: प्रवाशाला पोलिसांच्या हवाली करणाऱ्या कॅबचालकाचा भाजपकडून गौरव

ते पुढे म्हणाले, मी मैदान सोडून पळणाऱ्यातला नाही. सत्ता आल्याशिवाय मी महाराष्ट्र सोडणार नाही. या सरकारने सत्तेवर आल्यापासून एकच काम अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे, ते म्हणजे आधीच्या सरकारच्या कामांना स्थगिती देणे. 

हर्षवर्धन जाधव यांची घरवापसी; राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'मनसे'प्रवेश

आमच्या सरकारच्या काळात आम्ही कधी बदल्याची भावना ठेऊन वागलो नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आमच्याकडे काम घेऊन यायचे. त्यांची कामे आम्ही करायचो. आम्ही संघर्षातून इथे आलो आहोत. सत्तेचा माज करु नका, नाहीतर लोकच सत्तेवरुन तुम्हाला खाली उतरवतील. आमच्या कार्यकर्त्यांना जर त्रास दिला तर तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीला इशाराही दिला.

CAA विरोधात नागपाड्यात आंदोलन करणाऱ्या २०० महिलांवर गुन्हा दाखल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:will not go to Delhi unless the bjp government bring back in maharashtra says devendra fadnavis