पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरेच्या मुद्यावरुन आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा

आदित्य ठाकरे

सत्तेत आल्यानंतर आरे परिसराला जंगलाचा दर्जा दिला जाईल, असे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे का दाखल करण्यात आले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेत्त आल्यावर वृक्षतोड करणाऱ्यांना बघून घेऊ असा इशारा दिला होता. 

पर्यावरणवाद्यांच्या पदरी निराशा, निर्णयाला स्थगिती देण्यास HCचा

महायुतीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेल्या आदित्य ठाकरेंनी फडणवीस सरकारवर तोफ डागली. शांततेने आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबणाऱ्यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आरेतील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी आमने-सामने आले आहेत. ३८ लोकांना अटक करण्यात आली होत तर ५५ जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

कामाला नाही मतदानाला जायचं! मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

आरे कॉलनीतील वृक्ष तोडीप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करावा यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. २ हजार ६५६ वृक्षांना वाचवण्यासाठी आंदोलन करत असलेल्या कार्यकर्ते, सामाजिक संघटनांना सलग दुसऱ्या दिवशी झटका बसला. मुंबई मेट्रो कॉर्पोरेशननेही (एमएमआरसी) नवीन नोटीस जारी करण्याच्या कार्यकर्त्यांचा दावा फेटाळला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:why arresting detaining citizens and youth for standing with environment aditya thackeray on AareyForest