पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पक्ष सोडून गेलेले नेते म्हणतात परत येऊ का?: अजित पवार

अजित पवार

विधानसभा निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला आहे, त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागा, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला आहे. ते पक्षाच्या बैठकीत बोलत होते. कोणाला पक्ष सोडून जायचे असेल तर आत्ताच जा, असा दमही त्यांनी काठावर असलेल्या नेत्यांना दिला. तसेच पक्ष सोडून गेलेले नेते आता परत येऊ का, असे विचारत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

जय महाराष्ट्र! संजय राऊत यांचा अजित पवारांच्या फोनवर मेसेज

ते म्हणाले, पराभव झाल्यामुळे सगळे संपले असे समजण्याचे अजिबात कारण नाही. पराभव झालेल्यांनी खचून जाऊ नका. विलासराव देशमुख यांचा ४० हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत ते ८० हजार मतांनी निवडून आले. नंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे सगळे संपले असे म्हणत खचून जाऊ नका.

'कागदी घोडे नाचवू नका, हेक्टरी २५ हजार शेतकऱ्यांच्या हातात द्या'

नव्या दमाच्या तरुणांना संधी द्या. अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करा. कोकणात मोठ्याप्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

युतीबद्दल संजय राऊत यांची मतं वैयक्तिकः राम कदम